Tarun Bharat

युनियन जिमखाना – दाभोली गोवा यांच्यात अंतिम लढत

क्रीडा  प्रतिनिधी /बेळगाव

झेवर गॅलरी चषक 11 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात युनियन जिमखाना संघाने सीसीआय संघाचा 7 गडय़ांनी तर दाभोली अकादमी गोवा संघाने आनंद अकादमी बेळगाव संघाचा 69 धावानी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अद्वैत पाटील व कियान थोटा सामनावीर ठरले.

Advertisements

पहिल्या उपांत्य सामन्यात सीसीआय संघाने 21.5 षटकात सर्व बाद 45 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे अद्वैत पाटील 3, मोहम्मद हमजा 2, अब्बास किल्लेदार व फरहान शेख यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

उत्तरादाखल युनियन जिमखाना संघाने 10.5 षटकात 3 बाद 46 धावा करून सामना 7 गडय़ांनी जिंकला. विश्रुत कुंदरनाडने 13, मोहम्मद हमजाने नाबाद 10 धावा केल्या. सीसीआयतर्फे स्वयम खोत व खंडू पाटीलने प्रत्येकी एक गडी बाद केला.

दुसऱया उपांत्य सामन्यात दाभोली संघाने 25 षटकात 4 बाद 202 धावा केल्या. कियान थोटाने 8 चौकारासह 67, शौर्य चोडणकरने 6 चौकारासह 59, अदीप मिस्कीनने 23 धावा केल्या.

आनंदतर्फे अथर्व करडीने 2 गडी बाद केले. उत्तरादाखल आनंद क्रिकेट अकादमी संघाचा डाव 21.4 षटकात सर्वबाद 133 धावात आटोपला. सचिन तलवार 43, आरुष देसुरकर 31, अमर पटवेगारने 18 धावा केल्या. दाभोलीतर्फे स्वप्नील नाईकने 3, अभिराज कळंगुटकर, निहाल पेडणेकर, पार्थ संकपाळ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

Related Stories

मनपाने थकविले 86 कोटीचे वीजबिल

Omkar B

शैक्षणिक दर्जात अव्वल असणारे केंब्रिज स्कूल बेळगावात

Patil_p

बैलूर भागात सुगी हंगाम जोरात

Patil_p

श्री सत्य प्रमोद सेवा संघातर्फे अन्नाची पाकिटे वितरीत

Amit Kulkarni

अनुसुचित जाती-जमातीच्या आरक्षणामध्ये वाढ करा

Amit Kulkarni

स्वच्छतेसाठी वॉर्डस्तरीय अधिकारी-कंत्राटदारांची यादी जाहीर

Amit Kulkarni
error: Content is protected !!