नवी दिल्ली
शेअर बाजारातले प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एअरच्या ताफ्यात 72 बोईंग 737 मॅक्स विमानांपैकी पहिले विमान नुकतेच दाखल झाले आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवे विमान दाखल झाले असून तिचे कंपनीच्या अधिकाऱयांकडून स्वागत करण्यात आले. व्यावसायिक विमानसेवा सुरू करण्याबाबतच्या हालचालींना वेग देण्याचा प्रयत्न आता कंपनी आगामी काळात करणार आहे.