वाळपई : लोकसंवर्धन मांड यांच्यातर्फे सत्तरीत पहिले लोक वस्तुसंग्रहालय तयार केले आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते शनिवार दि. 28 रोजी दुपारी 4 वा. केरी सत्तरी येथे होणार आहे. या कार्यक्रमाला सभापती रमेश तवडकर, कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, आमदार तथा गोवा वन विकास महामंडळाच्या चेअरमन डॉ. देविया राणे, गोवा पर्यटन महामंडळाचे साहाय्यक व्यवस्थापक व लोकसंपर्क अधिकारी दीपक नार्वेकर, केरी पंचायतीच्या सरपंच दीक्षा गावस, स्थानिक पंचायत सभासद तनवीर पांगम यांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन लोक वस्तू संकलक गोपीनाथ गावस, लोकवस्तू संग्रहालयाचे मार्गदर्शक पांडुरंग गावस व आमचे दायज या संस्थेचे अध्यक्ष चंदन गावस यांनी केले आहे.
Previous Articleमळा-पणजी येथील हिंदू वाचन मंदिराचा उद्या स्थापनादिन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.