Tarun Bharat

पहिला वनडे सामना वाया

वृत्तसंस्था/ इस्ट लंडन

यजमान दक्षिण आफ्रिका आणि विंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना मुसळधार पावसामुळे वाया गेला. गुरुवारी येथे हा सामना आयोजित केला होता पण खेळ सुरू होण्यापूर्वीच पावसाचा अडथळा सुरू झाला आणि सातत्याने सरी कोसळल्याने पंचांनी हा सामना रद्द झाल्याची घोषणा केली.

या सामन्यासाठी पावसाळी वातावरणामुळे नाणेफेकही करण्यात आली नाही. पंचांनी दोन तासांच्या अंतरानंतर खेळपट्टी आणि मैदानाची पाहणी केली आणि त्यांनी हा सामना होऊ शकणार नाही असे सांगितले. आता या मालिकेतील दुसरा सामना ईस्ट लंडनमधील बफेलो पार्क मैदानावर शनिवारी खेळवला जाणार असून येत्या मंगळवारी मालिकेतील शेवटचा सामना पोश्चेस्ट्रुम येथे होणार आहे.

Related Stories

पंजाबचा हैदराबादवर निसटता विजय

Patil_p

रद्द झालेल्या सामन्यात जेमिमाची फटकेबाजी

Amit Kulkarni

नदाल, व्हेरेव्ह उपउपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

वरिष्ठ वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय कुस्ती संघ जाहीर,

Patil_p

‘स्टिंग ऑपरेशन’मुळे चेतन शर्मा वादात

Patil_p

आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा लांबणीवर

Patil_p