वार्ताहर /सांबरा
कणबर्गी येथे मेन रोडनजीक असलेल्या थोरल्या तलावातील मासे अचानक मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
येथील मेन रोडनजीक थोरले तलाव नावाचा तलाव आहे. अलीकडेच या तलावाच्या सभोवती स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सौंदर्यीकरणही करण्यात आले आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून सतत मासे मृत्युमुखी पडत असल्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे तलावातील पाणी दूषित झाले आहे की अन्य कोणत्या कारणाने मासे मृत्युमुखी पडत आहेत हे पाहणे गरजेचे आहे. यासाठी महानगरपालिकेने तातडीने योग्य ती खबरदारी घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.