दुसऱ्या बाजूचे प्रवेशद्वार सुरू असल्याने वाहनधारकांची गैरसोय, रस्ताकामामुळे अडचण
प्रतिनिधी /बेळगाव
किल्ला येथील दुर्गामाता मंदिर परिसरातील प्रवेशद्वार वाहतुकीस बंद ठेवण्यात आले आहे. येथील रस्ता खराब झाल्याने पेव्हर्स घालण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करण्यात येत आहे. पण सध्या एका बाजूचे प्रवेशद्वार बंद असून दुसऱ्या बाजूचे सुरू असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
किल्ला दुर्गामाता मंदिरासमोरील रस्ता पूर्णपणे खराब झाला होता. या दरम्यान वाहनधारकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. रस्त्यावर निर्माण झालेल्या ख•dयांमुळे वाहनांची गर्दी होत होती. त्यामुळे प्रवेशद्वारावरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करण्यात येत आहे. येथील रस्त्यावर पेव्हर्स घालण्यात येत आहेत. त्याकरिता येथील प्रवेशद्वार बुधवारपासून बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना ये-जा करण्यास रस्ता बंद ठेवण्यात आला आहे.
मात्र फोर्ट रोड परिसरात असलेले प्रवेशद्वार खुले असल्याने वाहनधारक दुर्गामाता मंदिरकडे जात आहेत. पण त्याठिकाणी रस्त्याचे काम करण्यात येत असल्याने पुन्हा माघारी परतावे लागत आहे.
किल्ला परिसरात राहणाऱ्या रहिवाशांसाठी हे प्रवेशद्वार खुले ठेवण्यात आले आहे. मात्र अन्य वाहनधारकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे किल्ला परिसरातील रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनधारकांनी अन्य मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे.