Tarun Bharat

अखेर चार दिवसांच्या घसरणीचे सत्र थांबले

सेन्सेक्स 160 अंकांनी तेजीत : ऍक्सिस बँक, एल ऍण्ड टी वधारले

वृत्तसंस्था /मुंबई

भारतीय भांडवली बाजारातील कामगिरीमुळे बीएसई सेन्सेक्स 160 अंकांनी नफा कमाईत राहिल्याचे दिसून आले. जागतिक पातळीवरील मिळता जुळता कल राहिल्याने बँकां व वाहन या क्षेत्रात लिलाव झाल्याने बाजार  तेजीत राहिला होता. विविध घडामोडींमध्ये गुजरात व हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहिर झाला. गुजरातमध्ये भाजपने विक्रमी विजय प्राप्त  केला असून त्यांना हिमाचलमध्ये पराभव स्विकारावा लागला आहे. या सर्वाचा परिणाम हा भारतीय बाजारावर झाला आहे.

विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या सलगच्या विक्रीमुळे बाजाराला मागील चार सत्रातील घसरणीला विराम देण्यात यश मिळाले आहे. दिवसभरातील कामगिरीत बीएसई सेन्सेक्स 160 अंकांनी वधारुन निर्देशांक 62,570.68 वर बंद झाले आहे. यासोबतच राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीने 48.85 अंकांची तेजी प्राप्त करत निर्देशांक 18,609.35 वर बंद झाले आहे.

सेन्सेक्समध्ये ऍक्सिस बँक, इंडसइंड बँक, लार्सन ऍण्ड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, भारतीय स्टेट बँक आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्रा यांचे समभाग लाभासह बंद झाले. यात सेन्सेक्समधील 13 समभाग लाभासह तर 15 समभाग नुकसानीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये सनफार्मा हे सर्वाधिक 3.57 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहे. कंपनीने गुजरातमध्ये असलेल्या कारखान्यात अमेरिकन औwषध व खाद्य प्रशासनाकडून आयात सतर्कता यादीत ढकलल्याने कंपनीचे समभाग खाली आलेत. यासह पॉवरग्रिड कॉर्प, टीसीएस, नेस्ले इंडिया, विप्रो, कोटक बँक  हे घसरणीसह बंद झाले आहेत.

 आर्थिक नरमाई आणि फेडरल रिझर्व्ह बँक यांच्या व्याजदर वाढीच्या घोषणेच्या संकेतामुळे  मोठय़ा प्रमाणात चढउतार राहिला होता, म्हणून आयटी व औषध कंपन्यांचे समभाग प्रभावीत होत सार्वजनिक बँकाही नुकसानीत राहिल्या होत्या.

समभाग वधारलेल्या कंपन्या

 • ऍक्सिस बँक……. 939
 • इंडसइंड बँक… 1191
 • लार्सन ऍण्ड टुब्रो 2167
 • आयसीआयसीआय 931
 • इन्फोसिस…….. 1619
 • स्टेट बँक……….. 611
 • बजाज फिनसर्व्ह 1618
 • महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 1274
 • एचडीएफसी बँक 1620
 • टाटा स्टील……… 111
 • मारुती सुझुकी.. 8689
 • एचडीएफसी…. 2666
 • अल्ट्राटेक सिमेंट 7174
 • बँक ऑफ बडोदा 188
 • फेडरल बँक……. 135
 • बंधन बँक………. 251
 • आयशर मोर्ट्स. 3321
 • ओएनजीसी…….. 142
 • अंबुजा सिमेंट….. 587
 • कोलगेट………. 1634
 • जेएसडब्लू स्टील. 744

समभाग घसरलेल्या कंपन्या

 • सनफार्मा………… 980
 • पॉवरग्रिड कॉर्प… 217
 • टीसीएस………. 3350
 • कोटक महिंद्रा.. 1897
 • विप्रो…………….. 403
 • बजाज फायनान्स 6581
 • डॉ.रेड्डीज लॅब… 4337
 • टेक महिंद्रा…… 1073
 • नेस्ले…………. 19803
 • आयटीसी……….. 338
 • टायटन………… 2583
 • एनटीपीसी……… 171
 • एचसीएल टेक.. 1101
 • हिंदुस्थान युनि… 2701
 • एशियन पेन्ट्स.. 3220
 • भारती एअरटेल.. 833
 • रिलायन्स इंडस्ट्रीज 2649
 • ल्यूपिन………….. 754
 • सीजी कझ्युमर…. 351
 • मॅक्स फायनान्स.. 705
 • अशोक लेलँड     145

Related Stories

शेअर बाजारात दमदार तेजीचा धडाका

Patil_p

एचडीएफसी बँक चेअरमनपदी अतून चक्रवर्ती

Omkar B

मंदीच्या तप्त वातावरणातली झुळूक!

Patil_p

‘पेटीएम’चा 22 हजार कोटींचा आयपीओ लवकरच

Amit Kulkarni

लिसियस बनली 30 वी युनिकॉर्न कंपनी

Patil_p

व्हर्च्युअल व्हीजिटींग कार्डची सुविधा आता गुगलवर उपलब्ध

Patil_p