सेन्सेक्स 456 अंकांनी मजबूत ः निफ्टी 18,000 वर
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारात सलगचे चौथे सत्र चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी तेजीसह बंद झाले आहे. यामध्ये सेन्सेक्स व निफ्टी दोन्हींचेही निर्देशांक मजबूत स्थिती प्राप्त करत बंद झाले आहेत. निफ्टी133 अंकांच्या तेजीसह चार एप्रिल नंतर पहिल्यादाच निर्देशांकांने 18,000 अंकांचा टप्पा प्राप्त केल्याची नोंद करण्यात आली आहे.
यामध्ये मंगळवारी विदेशी संस्थाकडून करण्यात येणाऱया सलगच्या लिलावामुळे व जागतिक बाजारातील तेजीच्या प्रभावामुळे देशातील शेअर बाजाराला समर्थन मिळाले आहे.
चालू आठवडय़ातील दुसऱया सत्रात व मागील तीन सत्रात शेअर बाजाराने तेजी कायम ठेवली आहे. यामध्ये दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 455.95 अंकांनी वधारुन 0.76 टक्क्यांसह निर्देशांक 60,571.08 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 133.70 अंकांच्या मजबुतीसह निर्देशांक 18,070.05 वर बंद झाला आहे.
बाजारात तेजीचा माहोल राहण्याचे प्रमुख कारण म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांकडून करण्यात येणाऱया गुंतवणुकीमुळे व अन्य घटनांच्या भागीदारीमुळे बाजाराला मजबूत स्थिती प्राप्त झाली. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्समध्ये बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, टायटन आणि बजाज फायनान्स यांचे समभाग नफा कमाईत राहिले यासोबतच एचडीएफसी बँक, एचडीएफसी, पॉवरग्रिड कॉर्प, लार्सन ऍण्ड टुब्रो, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक यांचे समभाग वधारत बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये टीसीएसचे समभाग सर्वाधिक 0.37 टक्क्यांच्या घसरणीत राहिले आहेत.
आशियातील अन्य बाजारांमध्ये चीनचा शांघाय कम्पोजिट, जपानचा निक्की आणि दक्षिण कोरियाचा कॉस्पी हे तेजीत राहिले. यासह हाँगकाँगचा हँगसेंग घसरणीत राहिला. याचदरम्यान लंडनमधील ब्रेंड क्रूड वधारुन 95.15 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.