एपीएमसी रोडशेजारी मनपाकडून कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील फुटपाथ, सायकल ट्रक आणि रस्त्याशेजारी विविध प्रकारचे व्यवसाय थाटून अतिक्रमण केल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रारी वाढल्याने बुधवारी एपीएमसी रोडशेजारी फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात आली. कारवाईला आक्षेप घेऊन पूर्वसूचना न देता दुकाने कशी हटविता? असा प्रश्न व्यावसायिकांनी उपस्थित केला. मात्र रस्त्याशेजारील दुकाने हटवा, अशी भूमिका अधिकाऱयांनी घेतली.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कोटय़वधी निधी खर्च करून फुटपाथ, सायकल टॅक आणि रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले आहे. मात्र बहुतांश फुटपाथवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून व्यवसाय थाटले आहेत. सायकल ट्रकचा वापरदेखील व्यावसायिक करू लागले आहेत. त्यामुळे सायकलचालक आणि पादचाऱयांनी कसे जायचे? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. तसेच काही ठिकाणी फुटपाथवर वाहने पार्क केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे फुटपाथवर झालेल्या अतिक्रमणाबाबत महापालिकेकडे असंख्य तक्रारी दाखल झाल्या आहेत.
या तक्रारींची दखल घेऊन रस्त्याशेजारील अतिक्रमणे हटविण्याचा आदेश महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी मंगळवारी बोलविलेल्या बैठकीत दिला. यावेळी अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांबाबत चर्चा करण्यात आली. फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई तातडीने करण्याचा आदेश दिल्याने बुधवारी सकाळपासून ही मोहीम राबविण्यात येत आहे. एपीएमसी रोडशेजारील फुटपाथवर काही फळविपेत्या व्यावसायिकांनी कायमस्वरुपी खोकी थाटली आहेत. त्यामुळे फुटपाथचा वापर व्यावसायिक करीत आहेत.
पादचाऱयांसाठी निर्माण करण्यात आलेल्या फुटपाथवर व्यावसायिकांनी ठाण मांडल्याने पादचाऱयांनी कसे जायचे? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार बुधवारी सकाळी एपीएमसी रोडशेजारील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात आली. कायमस्वरुपी खोके हटविण्यासह काही खोके जप्त करण्यात आले. पूर्वसूचना न देता अचानक कारवाई केल्याने फळविपेत्यांचे नुकसान होत आहे, असे सांगून कारवाईला आक्षेप घेण्यात आला. तसेच एक दिवस मुदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र खोके तातडीने हलवा अन्यथा जप्त करू, असा इशारा मनपा अधिकाऱयांनी देऊन फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई केली.
महापालिकेचे साहाय्यक कार्यकारी अभियंते सचिन कांबळे, वरि÷ अभियंत्या सुजाता बेन्नी, अभियंते मुत्तू, अंकित, संजय गंगधर आदींसह महसूल विभाग व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांची नियुक्ती अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पथकामध्ये करण्यात आली होती. या पथकाच्या माध्यमातून अतिक्रमणे आणि फुटपाथवर ठाण मांडलेल्या व्यावसायिकांना हटविण्याची कारवाई करण्यात आली.