Tarun Bharat

भविष्य

दि. 8-5-2022 ते 14-5-2022 पर्यंत

मेष

या आठवडय़ामध्ये वादावादीचे प्रसंग येऊ शकतात. एखाद्या जुन्या प्रकरणामुळे त्रास होऊ शकतो. आरोग्याच्याबाबतीत संमिश्र परिणाम दिसेल. आर्थिक आवक थोडी कमी असेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणालाही पैसे उधार देऊ नका. जामीन राहणे टाळावे. कामाच्या ठिकाणी चुका होऊ देऊ नका. 

कपिला गायीला चारा घालावा.

 वृषभ

या आठवडय़ामध्ये नात्यांमध्ये कटुता येऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे. तब्येत ठीकठाक असेल. पैशांची आवक समाधानकारक असेल. सगळे असूनसुद्धा काहीतरी उणीव आहे असे तुम्हाला जाणवेल. वैवाहिक जीवनामध्ये काटकसरीमुळे वादावादी होऊ शकते. अपरिचित व्यक्तीपासून दूर राहावे.

अशोकाचे पान कुंकू लावून जवळ ठेवा.

मिथुन

एखादे प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर तुमच्याकरता चांगली बातमी कळू शकेल. तुम्ही केलेल्या अर्जाचा अपेक्षित प्रतिसाद मिळेल. सरकारी कामे होतील. तब्येतीची विशेष काळजी घ्यावी. तुमच्या स्वभावामुळे अवघड काम होऊन जाईल. चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करू नका. लाजाळूचे झाड घरी लावावे.

कर्क

कामाच्या किंवा नोकरीच्या ठिकाणी काही अनपेक्षित बदल घडू शकतात. तुम्ही ते नाराजीने स्वीकाराल. सहकाऱयांचे बोलणे मनाला लागू शकते. तब्येतीची हेळसांड करून चालणार नाही. प्रेमीजनांनी सावध असावे. आर्थिक बाबतीत समाधानकारक वातावरण असेल. एखाद्याचा सल्ला फायदा देऊ शकतो.

 आंब्याची पाच पाने धार्मिक ठिकाणी ठेवून द्यावीत.

सिंह

काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील. परिवारातील वातावरण संतुलित राहावे यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. हलगर्जीपणामुळे तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. हातापायाला एखादी जखम होऊ शकते. आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करावे लागेल.  प्रेमीजनांनी एकमेकांच्या मतांचा आदर करावा. वैवाहिक जीवनात तणाव असेल. भटक्मया कुत्र्यांसाठी खाण्याची आणि पाण्याची सोय करावी.

कन्या

 निर्णय घेताना गोंधळ होऊ शकतो. तुमच्या गरजांना प्राधान्य देण्याची गरज आहे. दुसऱयावरती अतीविश्वास किंवा अविश्वास दोन्ही टाळण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात आनंद असेल. जाड पानांच्या झाडांपासून दूर राहा. आर्थिक बाबतीत सर्वसाधारण परिणाम मिळतील आयत्या वेळी मित्राची साथ मिळाल्यामुळे फायदा होईल. पक्ष्यांकरता पाण्याची सोय करावी.

तूळ

सध्या तुमची मनःस्थिती तितकीशी चांगली नाही. एखाद्या गोष्टीची उणीव तुम्हाला जाणवते आहे. ही उणीव व्यक्ती किंवा वस्तूची असू शकते. या काळात आर्थिक बाबतीत यश मिळाले तरी तुम्ही तितकेसे खुश नसाल. वैवाहिक जीवनामध्ये एकमेकावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. संततीच्या दृष्टीने हा आठवडा चांगला असेल. प्रेमीजन एकमेकाच्या सहवासाचा आनंद घेतील.

गरजूला अन्नदान करावे.

वृश्चिक

 मेहनतीचा परतावा मिळेल. आरोग्याच्या समस्या असतील. या आठवडय़ात एखादा नवीन प्रकल्प सुरू कराल. तुम्ही घेतलेले काही निर्णय अचूक ठरतील व त्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. घरातील वातावरण चांगले असेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. वैवाहिक जोडीदाराच्या मतांचा आदर करा. पैशांच्याबाबतीत हा आठवडा उत्तम असेल.

निळय़ा रंगाच्या कपडय़ांचा वापर शक्मयतो टाळावा.

धनु

कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा असेल पण याचवेळी वादसुद्धा संभवतात. जुनी येणी वसूल करण्याकरता कठोर शब्दांचा वापर टाळावा. समजलेली बातमी ही नक्की खरी आहे का हे कळल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये. प्रवास होऊ शकतो. वैवाहिक जीवन सर्वसाधारण असेल.

पिवळय़ा रंगाची काचेची गोटी जवळ ठेवावी.

मकर

या आठवडय़ामध्ये व्यवसाय किंवा नवीन नातेसंबंध यांच्याबद्दल काही नवीन माहिती मिळेल. कदाचित ही बातमी व्यवसाय विस्ताराची किंवा नवीन नातेसंबंधाची असू शकते. ही बातमी एखाद्या कलेशी निगडित किंवा सभ्य व्यक्तीकडून मिळेल. अध्यात्माकडे कल जास्त असेल. कोणताही व्यवहार करताना सावध असावे. आर्थिक धोरणाबद्दल केवळ चर्चा न करता कृती करावी.

 माशांना कणकेचे गोळे घालावे.

कुंभ

 तुम्ही जे काम करत आहात त्यासाठी योग्य अशी माणसे भेटतील. त्यामुळे पुढे जाण्यासाठी चांगली मदत मिळेल. कामाला जरी उशीर झाला तरी चिडून न जाता स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. या आठवडय़ामध्ये केलेल्या कामांचा फायदा भविष्यात नक्कीच चांगला होईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये टाळाटाळ करू नये. कुटुंब सुख चांगले मिळेल.

वृद्ध व्यक्तीला आर्थिक मदत करावी.

मीन

तुम्ही केलेल्या कष्टांचा योग्य तो परतावा मिळेल. एखाद्या नवीन कामाची संधी मिळेल. जवळची एखादी व्यक्ती विश्वासघात करू शकते. पैशांच्याबाबतीत कोणावरही अति विश्वास ठेवू नका. एखादी वस्तू गहाळ होऊ शकते. करमणुकीकरता प्रवास कराल. मित्रांच्या मदतीने कामाच्या नवीन संधी मिळतील. आर्थिक नियोजन चुकण्याची शक्मयता आहे. खर्च वाढू शकतो.

लहान मुलांना आंबट-गोड वस्तू वाटावी

टॅरो उपाय ः कामे होता होता रहात असतील, यश मिळत नसेल, तर गोपीचंदनाच्या नऊ काडय़ा केळीच्या झाडाला बांधाव्यात.

Related Stories

आजचे भविष्य मंगळवार दि. 30 जून 2020

Patil_p

आजचे भविष्य 26-11-2021

Amit Kulkarni

राशींचा देश-टॅरोचा संदेश

Patil_p

आजचे भविष्य 10-12-2021

Amit Kulkarni

राशींचा देश -टॅरोचा संदेश

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 22 सप्टेंबर 2020

Patil_p