Tarun Bharat

भविष्य

Advertisements

8-6-2022 ते 14-6-2022 पर्यंत

ऋणानुबंधाच्या गाठी पितृ ऋण पितृदोष आणि बरेच काही. . .

(भागा2-जन्म, पुनर्जन्म आणि पितर)

हा विषय नीट समजून घ्यायचा झाला तर आपल्याला ज्योतिष आणि अध्यात्म यातला दुवा असणाऱया ‘आत्मा’ या संकल्पनेचा नीट अभ्यास केला पाहिजे. एकीकडे पुनर्जन्म या संकल्पनेनुसार आत्मा पुनर्जन्म घेतो आणि दुसरीकडे आपण ज्या व्यक्ती मरण पावल्या आहेत त्यांचे श्राद्ध करतो, असे समजून की आपण केलेल्या श्राद्धाने, अन्नदानाने पूर्वजांचा आत्मा तृप्त होतो. हा विरोधाभास नाही आहे का हेही समजून घेऊया. अब्राहमीक धर्म सोडले (म्हणजे इस्लाम, ख्रिस्ती) तर जवळपास सगळय़ा धर्मांमध्ये पुनर्जन्म ही संकल्पना आहे. केवळ भारतच नाही ही तर कित्येक देशांमध्ये पुनर्जन्म आठवणारी माणसे आहेत. मागच्या जन्मी आपण कोण होतो, आपले गाव कुठले, यापासून ते आपल्या नातेवाईकांनासुद्धा ते ओळखतात. आपणही सर्रास म्हणतो की अमूक एक जन्म घेऊन या घरात आला आहे. अविनाशी आत्म्याचा प्रवास हा शरीर सोडल्यानंतर त्या जन्मात केलेल्या कर्मानुसार एका विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी नवीन शरीर धरण करण्यामध्ये होतो. शरीर सोडल्यानंतर दुसरे शरीर धारण करण्यामधला जो काळ आहे त्या काळामध्ये आत्मा कुठल्या स्थितीमध्ये असतो त्याला शास्त्रामध्ये वेगवेगळी नाव दिलेली आहेत. ज्याला प्रेतयोनी, पितरयोनी अशा वेगवेगळय़ा अवस्थांची संज्ञा देता येते. आपल्याला हे माहीत नाही म्हणून आपण या क्ष अवस्था असे म्हणूया. या क्ष अवस्थेतल्या आत्म्यांचा आपल्या आयुष्यावर होणारा परिणाम म्हणजेच पितर दोष किंवा पितृदोष इत्यादी. लक्षात घ्या, जिथे निर्मिती आहे तिथे निर्माता आहे. म्हणजेच आपल्याला हे शरीर ज्यांनी दिले त्यांचे आपल्यावर कर्ज आहे. हिंदू धर्मामध्ये तीन ऋणांची चर्चा केलेली आहे. देव ऋण, ऋषि ऋण आणि पितृ ऋण. देव ऋण फेडण्याकरता आपण यज्ञ याग वगैरे करतो किंवा त्यामध्ये सहभाग घेतो. धार्मिक उत्सवामध्ये भाग घेतो. आर्थिक सहाय्य करतो किंवा श्रमदान करतो. ऋषि ऋण फेडण्याकरता आपण ज्ञानाचा प्रसार करतो आणि पितरांचे ऋण फेडण्याकरता आपण पिंडदान, श्राद्ध वगैरे करतो. याला ऋण म्हणण्यापेक्षा कर्तव्य म्हणणे जास्त योग्य वाटते आणि या कर्तव्यांचे पालन आपण केलेच पाहिजे. पण विषय इथे संपत नाही. कुंडली बघितल्यानंतर किमान दहा असे योग असतात ज्याच्यामधून आपल्याला हे कळू शकते की एखाद्या कुटुंबाची वाईट अवस्था ही पितर कुपीत झाल्याने झाली आहे. इथे पितर या शब्दाचा अर्थ केवळ आपले आजोबा आई वडील आजी आजोबा पणजी पणजोबा किंवा त्यांचे आई-वडील अशा सात पिढय़ांपर्यंत जात नाही तर पूर्वजन्मी आपण जे होतो तेव्हा आपले पितर कोण होते मग तो जन्म कीटकाचा असेना पशु पक्ष्यांचा असेना जलचरांचा असेना कोणाचाही का असेना, अशा समस्त पितरांचा संदर्भ पितर किंवा पितृ या एका शब्दांमध्ये येतो इतकेच नाही तर असे नातेवाईकसुद्धा यात जमा होतात.

महा उपाय

घरात सतत आजारपण असणे यावरती उपाय. काही घरांमध्ये एकाचे आजारपण झाले की दुसरा आजारी पडतो. याकरता वैद्यकीय उपचाराबरोबर खालील तोडगा करून पहावा.  काळय़ा हळदीचा तुकडा घेऊन गंगाजलाने धुऊन त्याला शुद्ध लोबानाचा धूर दाखवावा. कोणी आजारी पडल्यास याचा तुकडा जवळ ठेवल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होते.

 सोपी वास्तु टीप बेडरूमच्या बरोबर वरती पाण्याची टाकी असू नये

मेष

 विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करण्याची गरज आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी अपुरी राहू नये याची खबरदारी घ्यावी लागेल. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नोकरीमध्ये अडचणीचा काळ आहे. धार्मिक अनुभूती येऊ शकते. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. नावलौकिक वाढण्याचे योग आहेत. दुरून उत्तम बातमी कळेल.

उपाय गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करावी

वृषभ

आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. त्वचेसंबंधी विकार उद्भवू शकतात. मनात असूनदेखील धनसंचय होणे अवघड असेल. कुटुंबातील वातावरणाला बिघडवणारी घटना घडू शकते. प्रवासात मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता आहे. जमिनीसंबंधी व्यवहारात अडचणी येऊ शकतात. नोकरीमध्ये प्रमोशनचे योग आहेत. अचानक धनलाभ संभवतो. गुरुतुल्य व्यक्तीची साथ मिळेल.

उपाय औदुंबराच्या झाडाला हळद घालून पाणी घालावे.

मिथुन

स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. संततीकडून उत्तम समाचार मिळेल. मनोरंजनाकडे कल असेल. नोकरीमध्ये ताण तणाव संभवतो. वैवाहिक जीवनामध्ये हे आनंदाचे क्षण येतील. वाहन चालवताना सावध असणे गरजेचे आहे. दूरच्या प्रवासाचे योग बनत आहेत. व्यावसायिकदृष्टय़ा उत्तम काळ आहे. संधीचे सोने करावे.

उपाय पाण्यामध्ये लाल चंदन घालून सूर्याला अर्पण करावे.

कर्क

ज्या संधींची तुम्ही आतुरतेने वाट पहात होतात त्या प्राप्त होतील. पोटाचे दुखणे येऊ शकते. तिसऱया व्यक्तीमुळे घरात वाद संभवतो. प्रवास शक्मयतो टाळावा. वाहन सुख उत्तम असेल. जमिनीचे प्रश्न मार्गी लागतील. शेअर्ससारखी धोकादायक गुंतवणूक टाळावी. धनप्राप्ती उत्तम असेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. भाग्याची साथ आहे. उपाय गरजू व्यक्तीला गुळाचे दान द्यावे.

सिंह

पूर्वी केलेल्या चुकांचा परतावा द्यावा लागू शकतो. आर्थिक पक्ष कमजोर असेल. कर्ज घेताना अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. नुकसान संभवते. कौटुंबिक सुख उत्तम असेल. परिवारासोबत आनंदाने वेळ घालवाल. प्रवासाचे योग आहेत. जमिनीचे व्यवहार टाळावेत. शेअर्ससारख्या गुंतवणुकीतून फायदा संभवतो. नोकरीत कामाचे चीज होईल. वैवाहिक जीवन समाधानी असेल.

उपाय लहान मुलांना केशरी रंगाची मिठाई वाटावी.

कन्या

धनप्राप्तीच्याबाबतीत भाग्यवान असाल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्मयता आहे. कुटुंबात छोटेखानी समारंभ होईल. लेखी व्यवहारात सावध असावे. घरासाठी नवीन फर्निचर घेण्याचा विचार कराल. छोटय़ा गुंतवणुकीतून फायदा होईल. संततीसुख उत्तम असेल. नोकरीत वरि÷ांना सहयोग मिळेल. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. कष्टाच्या मानाने परतावा मात्र कमी असेल.

उपाय मुंग्यांना साखर घालावी

तूळ

एखादे काम होता होता राहू शकते. मन शांत ठेवा. तब्येतीची काळजी मिटेल. एखाद्या ठिकाणी पैसे अडकण्याची शक्मयता आहे. कुटुंबात छोटय़ा गोष्टींवरून वाद संभवतात. प्रवासाचे उत्तम योग आहेत. मातृ सुख चांगले असेल. जमिनीचे व्यवहार होतील. छोटय़ा गुंतवणुकीतून लाभ होतील. चैनीकरता खर्च कराल. वैवाहिक जीवनात वाद संभवतात. नोकरीत पदोन्नतीचे योग आहेत.

उपाय दुर्गा चालिसाचा पाठ करावा.

वृश्चिक

एखाद्याला दिलेला शब्द पाळणे अवघड जाईल. पूर्वी होऊन गेलेले आजार पुन्हा उद्भवू शकतात. धनप्राप्तीच्याबाबतीत नशीब साथ देईल. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवाल. कामानिमित्त प्रवास संभवतो. शेअर्ससारख्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्मयता आहे. नोकरीत त्रास होऊ शकतो. जोडीदाराशी वाद होतील. मंगल कार्याकरता खर्च होईल. उपाय मोहरीचे तेल लावलेली चपाती कुत्र्याला खायला  घालावी.

धनु

आरोग्यासंबंधी तक्रारी दूर होतील. आत्मिक आनंद मिळेल. धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडू शकतात. नवीन एफडी कराल. दागिने खरेदीचे योग आहेत. प्रवासातून फायदा होईल. धोकादायक गुंतवणूक करू नका. संततीबद्दल चिंता वाटेल. वैवाहिक जोडीदाराशी छोटय़ा गोष्टींवरून भांडण होऊ शकते. प्रयत्न केल्यास सगळय़ा प्रकारचे लाभ होतील.

उपाय केशराचा टिळा कपाळी लावावा.

मकर

इच्छापूर्तीचे योग बनत आहेत. आरोग्याविषयी जागरूक असाल. धनप्राप्ती उत्तम असेल. किमती वस्तू खरेदी करण्याचे ठरवाल. कौटुंबिक सुख उत्तम असेल. लेखन कार्यात यश मिळेल. प्रवास घडू शकतो. जमिनीचे व्यवहार तुर्तास टाळावेत. धोकादायक गुंतवणूक करू नये. नोकरीत वरि÷ांचा त्रास संभवतो. कामाच्या ठिकाणी केलेले व्यवहार यशस्वी होतील. नावलौकिक वाढेल.

उपाय छाया दान करावे

कुंभ

आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी प्रयत्न कराल. आरोग्याची उत्तम साथ लाभेल. घरातील वातावरण हसरे असेल. सही करताना सावध असावे. समोरचा माणूस गैरफायदा उचलू शकतो. धोकादायक गुंतवणुकीपासून दूर रहावे. नोकरीतील राजकारणाचा कंटाळा येऊ शकतो. वैवाहिक जीवनामध्ये चढ-उतार असेल. तीर्थक्षेत्राला भेट देण्याची इच्छा होईल. वादामध्ये यश मिळेल.

उपाय देशी गाईच्या पायाखालील माती पाण्यात सोडावी.

मीन

आर्थिक बाजू कमकुवत होऊ नये म्हणून कष्टाचे प्रमाण वाढवावे लागेल. आरोग्य उत्तम असेल. प्रवासात त्रास संभवतो. अचानक धनलाभाचे योग येतील. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. नोकरीमध्ये सहकाऱयांमुळे त्रास संभवतो. वाहन चालवताना काळजी घ्यावी. प्रसिद्धीचे योग आहेत. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मित्रांचा सहयोग मिळेल. खर्चाच्या प्रमाणावर लक्ष द्यावे.

उपाय  5 कवडय़ा जवळ ठेवाव्यात.

Related Stories

आजचे भविष्य गुरुवार दि. 15 सप्टेंबर 2022

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 10 ऑक्टोबर 2020

Patil_p

राशीभविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.30 सप्टेंबर 2021

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.8 एप्रिल 2021

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 28 एप्रिल 2020

Patil_p
error: Content is protected !!