तेरे चेहरे में वो जादू है. . .
( मुख लक्षण -चेहऱ्यावरून वरून माणसाचा स्वभाव आणि शक्यता- भाग-4)
सामुद्रिक शास्त्राप्रमाणे नाक सरळ आणि सुंदर असणे हे उत्तम भाग्याचे लक्षण आहे. नाकाचा आकार डावीकडे वळला असेल तर अशा व्यक्ती सहसा इतरांकडून कामे करून घेण्यात पटाईत असतात. आकार उजवीकडे वळला असेल तर अशा व्यक्तींना फसवणे लोकांना सोपे जाते. नाकपुड्या लहान असणे हे देखील चांगल्या नशिबाचे लक्षण आहे. टोकदार नाक असलेल्या व्यक्ती मानी, आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवणाऱ्या आणि उत्तम भाग्याच्या असतात. गुलाबी ओठ असलेले गोड बोलणारे आणि आपल्या बोलण्याने दुसऱ्याला मोहून टाकणारे असतात. जाड ओठाच्या व्यक्ती सुखी समाधानी असतात असे आढळले आहे. पातळ आणि लांब ओठ असलेले कामी, विलासी, आणि लोभी असू शकतात. लहान ओठाच्या व्यक्ती काहीशा घाबरट आणि दुसऱ्याच्या बोलण्यामध्ये येऊन काम करणाऱ्या असतात. गडद रंगाच्या ओठांच्या व्यक्तींना आर्थिक समस्यांना जास्त सामोरे जावे लागते. जाड आणि मोठे कान असलेल्या व्यक्तींना नेतृत्व करायला आवडते. लांब कान असलेल्या व्यक्ती देखील सुखी आणि समाधानी असलेल्या आढळतात. सामुद्रिक शास्त्राप्रमाणे कानावर जास्त केस असू नयेत. आता या लेखाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आपण वळत आहोत. सामुद्रिक शास्त्रात तिळाला फार महत्त्व आहे. त्यातही चेहऱ्यावर जर तीळ असेल तर अशी व्यक्ती शनी प्रधान असते. म्हणजे लग्न कुंडली मध्ये प्रथम भावात शनी असू शकतो. जाणून घेऊया चेहऱ्यावर तीळ कुठे असेल तर काय शक्मयता असतात. चेहऱ्याच्या उजवीकडे तीळ असल्यास व्यक्तीला मान सन्मान मिळतो. अशा व्यक्तींनी सुखी जीवनाची अपेक्षा करायला हरकत नाही. ओठांच्या खाली तीळ असलेल्या व्यक्तींना इतरांच्या तुलनेने संघर्ष जास्त करावा लागतो. डाव्या कानाच्या वरच्या भागावर तीळ असल्यास व्यक्ती दीर्घायु पण अशक्त असते. जर नाकावर मध्यभागी तिळ असेल तर अशा व्यक्तीला वारंवार यात्रा कराव्या लागू शकतात. कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असल्यास व्यक्ती रोमँटिक असते आणि सुख पुर्वक जीवन जगते. ओठाच्या वरती तीळ असलेली व्यक्ती भोग विलासी असते आणि भरपूर भटकते. हनुवटी वर तीळ असल्यास व्यक्ती आपल्या कामाशी काम ठेवणारी आणि स्वार्थी असण्याची शक्मयता असते. उजव्या कानाच्या जवळ जर तीळ असेल तर अशी व्यक्ती धाडसी आणि साहसी असते. उजव्या कानाच्या वरच्या भागावर जर तीळ असेल तर अशी व्यक्ती सरळ स्वभावाची असते आणि युवा अवस्थेमध्येच प्रगतीच्या रस्त्यावर चालू लागते. गळ्यावर जर तीळ असेल तर अशी व्यक्ती बुद्धिमान असते आणि स्वकष्टावर यश प्राप्त करते. खर तर खरी जादू आपल्या आत असलेल्या आत्मविश्वासात आणि चांगुलपणात असते जी चेहऱ्यावर वर झळकते म्हणूनच लेखाचे नाव. . . तेरे चेहरे में वो जादू है !!! (समाप्त )
महा उपाय : काही कारण नसताना नात्यांमध्ये दुरावा येतो किंवा शत्रूता येते. अशावेळी संध्याकाळच्या वेळेला वायव्य दिशेला एका नारळावरती कापूर ठेवून पेटवावा. आपल्या कुलदैवतेचे स्मरण करून विरोधी व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणून शत्रुता नाहीशी व्हावी अशी प्रार्थना करावी. तो नारळ नाल्यात प्रवाहित करावा
सोपी वास्तु टिप : बांधकाम सुरू करत असताना बऱ्याचदा जड सामान जसे की विटा वाळू इत्यादी प्लॉटच्या ईशान्य भागात कधीही ठेवू नये. वास्तू बांधताना अनेक अडचणी येतात किंवा उशीर होतो
मेष
भाग्याची पूर्ण साथ मिळेल. धार्मिक स्थळाला भेट देण्याचा विचार कराल. घरात मंगल कार्य होण्याची शक्मयता आहे. विवाह उत्सुक व्यक्तींना अनुकूल काळ असेल. वैवाहिक जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. वैवाहिक जीवन आनंदमय असेल. आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारीमुळे त्रास होण्याची शक्मयता आहे. कुटुंबातील व्यक्तींसोबत चर्चा करत असताना चर्चेचे रूपांतर भांडणात होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
उपाय मारुतीला तीन बुंदीचे लाडू अर्पण करावे
वृषभ
केलेल्या कामाचा योग्य तो परतावा मिळेल. मन जरी उत्साहाने भरलेले असले तरी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असेल. कौटुंबिक समाधान प्राप्त होईल. धनप्राप्ती उत्तम असेल. खाण्यापिण्याच्या आवडी?ना जपाल. पण कुपथ्य होऊ देऊ नका. प्रवास करण्याचा विचार करत असाल तर सध्या टाळलेला बरा. लहान भावंडांशी काही कारणाने मतभेद होऊ शकतात. नोकरीत पगार वाढ आणि कामाचे कौतुक होऊ शकते.
उपाय देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा
मिथुन
स्वभावामध्ये थोडा बदल केला तर बरीच कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. तब्येतीची विशेष काळजी करण्याची गरज नाही. आत्मविश्वासात वाढ होईल. मित्रमंडळी सोबत एखाद्या कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ शकाल. धनप्राप्ती सर्वसाधारण असेल. व्यावसायिकांनी जास्त अपेक्षा करू नयेत. या काळात कोणाचीही चेष्टा करायला जाऊ नका. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. नोकरीमध्ये अपेक्षित यश मिळेल.
उपाय लहान मुलांना आंबट गोड मिठाई वाटावी
कर्क
तब्येतीला जपावे. बाहेरचे खाणे पिणे आरोग्य बिघडवू शकते. गॅसेस आणि पोट बिघडणे किंवा पोटाच्या तक्रारी त्रास देऊ शकतात. कुटुंबातील काही व्यक्तींच्या आतताई स्वभावामुळे मन दुखावले जाण्याची शक्मयता आहे. एखादा योजनेमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी पैसे अडकण्याची शक्मयता आहे सावध राहावे. प्रेम संबंधात वृद्धी होईल. छोट्या गुंतवणुकीतून लाभाची शक्मयता आहे. नोकरी करणाऱ्यांना चांगले अनुभव येतील.
उपाय अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर मीठ घालावे
सिंह
रागावर नियंत्रण ठेवले नाही तर नको त्या प्रसंगाला सामोरे जावे लागू शकते. आपल्या कृती आणि वाणीवर संयम ठेवलाच पाहिजे. आरोग्याच्या तक्रारिंकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर वैद्यकीय उपचार करून घेतले तर शीघ्र आराम मिळेल. या काळात पैशांच्या बाबतीत थोडी काळजी वाटू शकते. इन्कम कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती अनुभवायला येऊ शकते. प्रवासाचे उत्तम योग आहेत. भावंडांचे सहकार्य मिळेल.
उपाय केशर चंदनाचा टिळा लावावा
कन्या
संसर्गजन्य रोगांपासून सावध राहणे शहाणपणाचे ठरेल. अंगदुखी डोकेदुखी सारखे आजार त्रास देऊ शकतात. पैशांचे बाबतीत काळजी करण्याचे कारण नाही. अपेक्षा नाही अशा ठिकाणाहून आर्थिक मदत मिळू शकते. शेजाऱ्यांच्या मदतीमुळे एखादे काम पूर्ण कराल. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत चांगले संकेत आहेत. प्रेम संबंधात वाढ होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना जास्त मेहनत करण्याची गरज आहे.
उपाय गाईला गुळ चपाती खाऊ घाला
तूळ
प्रयत्नांना जर भाग्याची साथ मिळाली तर दुग्धशर्करा योग होतो याची प्रचिती या काळात येण्याची शक्मयता आहे. तीर्थयात्रेचा योग होत आहे. मनात धार्मिक विचार येतील. तब्येतीची काळजी करू नका. धनप्राप्ती उत्तम असेल. प्रभावी वाणीने लोक आकर्षित होतील. प्रवासात चांगल्या घटना घडू शकतात. लेखी व्यवहारात यश मिळेल. जमीन आणि वाहन यादृष्टीने उत्तम योग होत आहेत. शेअर बाजारापासून दूर राहा. नोकरीत बेचैनी जाणवेल.
उपाय होम करावा
वृश्चिक
तब्येतीच्या काही तक्रारी कमी झाल्यामुळे सुटकेचा श्वास घ्याल. आरोग्य चांगले झाल्याने उत्साहात वाढ होईल. कामे आत्मविश्वासपूर्वक कराल. ज्यामुळे पैशांचा प्रवाह चांगला असेल. परिवारात मागे घडलेल्या कटू घटना निवळल्याने आनंददायी वातावरण असेल. मनपसंत खाण्यापिण्याकडे तुमचा कल असेल. भावंडांकडून चांगली बातमी कळण्याची शक्मयता आहे. शेअर बाजारासारख्या गुंतवणुकीपासून दूर राहा.
उपाय देवीच्या मंदिरात कोहाळ्याचे दान द्यावे
धनु
शैक्षणिक कार्याशी संबंधित लोकांना अनेक संधी प्राप्त होण्याची शक्मयता आहे. आरोग्या विषयी योग्य तो निर्णय घेऊन स्वस्थ राहण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. पैशाची आवक चांगली असेल. व्यवसायिकांना तेजीचा अनुभव येईल. प्रवास टाळणे अशक्मय असेल तर पिवळी मिठाई खाऊन मग करावा. जमिनीचे व्यवहार तूर्तास टाळलेले बरे. आईच्या तब्येतीची काळजी वाटू शकते. नोकरी करणाऱ्यांना मनाविऊद्ध काम करावे लागेल.
उपाय सुकलेले नारळ जलप्रवाहीत करावे
मकर
उत्साहात वाढ होईल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे पण प्रयत्नांची कास सोडू नये. आरोग्य चांगले राहील. व्यक्तिमत्त्वात सुधारणा करण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक तंगी जाणवू शकते. कुटुंबात वाद होणार नाही त्याची काळजी घ्या. भावंडा बरोबर किंवा शेजाऱ्यांबरोबर असलेले नाते बिघडणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल. शेअर बाजारापासून धोका संभवतो. नोकरदार वर्गाला पगार वाढीची शक्मयता आहे.
उपाय उडदाचे दान द्यावे
कुंभ
वातावरणात आलेल्या बदलाचा परिणाम तुमच्या तब्येतीवर होऊ शकतो. लहान-मोठे आजार त्रास देतील. वैद्यकीय मदत घेण्यासाठी वेळ लावू नये. घरातील वातावरण काहीसे बिघडलेले जाणवेल. कागदोपत्री व्यवहारात सावध राहणे गरजेचे असेल. जमिनीच्या व्यवहारात फसवणूक होण्याची शक्मयता आहे. वाहन दुऊस्तीची वेळ येऊ शकते. मौजमजे कडे जास्त लक्ष असेल. नोकरदार वर्गाने अधिकाऱ्यांशी मर्जी राखणे आवश्यक आहे.
उपाय मंदिरात जोड केळ्याचे दान द्यावे
मीन
तुमच्या स्वभावाचा लोक गैरफायदा उचलणार नाहीत याची काळजी घ्या. दोस्ती खात्यात किंवा ओळखी खातर तुमच्याकडून कामे करवून घेतली जाऊ शकतात. तब्येत नाजूक असेल. पैशांची आवक तुलनेने कमी झाल्याने थोडी चिंता वाटू शकते. स्थावर मालमत्तेच्या संदर्भात चांगले योग आहेत. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्मयता आहे. धार्मिक कारणास्तव प्रवासाचा विचार कराल. समाजात मानसन्मान मिळेल.