Tarun Bharat

भविष्य

15.3.23 ते 21.3.23 पर्यंत

परीक्षा.. अभ्यास.. टेन्शन आणि उपाय

परीक्षांचा काळ सुरू आहे. फक्त विद्यार्थ्यांचाच नाही तर पालकांचासुद्धा. अभ्यास पूर्ण झालेला नाही, परीक्षेत मला आठवेल काय, परीक्षेत ब्लँक झालो तर काय करू, अभ्यासाला बसतो पण डोक्मयात काही जात नाही, परीक्षेला जाताना वाढलेली धडधड, नेमके परीक्षेच्या वेळेलाच आजारी पडणे, अमुक मित्र चिठ्ठय़ा घेऊन जातो मग मी पण जाऊ का? उद्या मॅथ्यस्चा पेपर आहे, माझे काही खरे नाही…. असे एक ना दोन, हजारो किस्से या काळात घडत असतात. विद्यार्थी मित्रांनो परीक्षा ही तुमची नाही तर त्या विषयात तुम्हाला किती कळते याची आहे हे ध्यानी घ्या. आयुष्यात प्रत्येक पावलाला कोणी ना कोणी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात परीक्षा घेतच असतो, मग परीक्षेला घाबरायचे कशाला?

 शालेय जीवनात अनुभवलेले प्रचंड यश, नंतरच्या काळात केलेल्या घोडचुका, त्या चुकांमधून शिकून पुन्हा मिळवलेले यश आणि सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे जवळजवळ वीस वर्षांचा प्राध्यापक म्हणून असलेला अनुभव, हजारो विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद या गोष्टींच्या बळावर तुम्हाला सल्ला देण्याचा प्रयत्न करतो आहे. मुळात लक्षात घ्या अभ्यास करणे म्हणजे घोकम्पट्टी नाही. काही ठिकाणी पाठ करणे भागच असते यात शंका नाही. पण पान भरून उत्तर पाठ करणे हे मला तितकेसे पटत नाही. खालीही चर्चा केलेली आहे त्यात ज्योतिषीयदृष्टय़ा अभ्यास कसा करावा, अभ्यास करण्याची वैज्ञानिक पद्धत काय आहे, स्मार्ट अभ्यास केल्यास यश का लवकर मिळते याबद्दल बोललेलो आहे.  सगळय़ात आधी अभ्यास आणि परीक्षा यांना टेन्शनच्या नजरेने, भीतीने, कर्तव्यभावनेने, नकारात्मकदृष्टय़ा बघायचे बंद करा. विद्या आत्मसात करणे किंवा अभ्यास करणे याला जर करमणुकीच्या, आनंदप्राप्तीच्या नजरेने पहायला सुरुवात केली तर अभ्यासात शंभर टक्के गती येतेच. विद्याप्राप्ती होतेच. (पंचम भाव = इच्छा, करमणूक, कला). (1) दस बार पढना = एक बार लिखना. यात ज्योतिषीय सूत्र असे आहे, अभ्यास करणे म्हणजे विद्या मिळवणे, जे तुमच्या कुंडलीतील पंचम स्थानावरून पाहिले जाते. लिहिणे हे बुधाचे काम आणि कुंडलीतील तिसरा भाव. जो पंचमाचा लाभ आहे. थोडक्मयात विद्येचा लाभ होण्याकरता विद्यार्थ्याने लिहिण्यावर भर द्यावा. मुद्दे वाचा, त्यावर विचार करा, त्यातील वेगवेगळय़ा शक्मयतेचा विचार करा आणि लिहून काढा. (2) विद्यार्थ्यांनी सुगंध, मेकअप, लक्झरी आयटम्स, ज्या शुक्राच्या वस्तू आहेत त्यापासून दूर रहावे. (3) केशराचा टिळा लावणे, मंदिरात जाणे याने गुरु ऍक्टिव्हेट होतो. (4)अभ्यास कधीही एका स्ट्रेचमध्ये न करता 40 मिनिटांचा एक स्लॉट या हिशोबाने करावा. 40 मिनिटानंतर पाच मिनिटांचा ब्रेक घ्यावा आणि त्यात तुम्हाला जे बरे वाटते जसे की फिरून येणे, थोडे खेळणे ज्यात शारीरिक हालचाल आहे हे करावे (डोपामाईन (dopamine) नावाचे आनंदी हार्मोन स्त्रवते आणि अभ्यास लक्षात राहतो. Serotonin, Dopamine, Endorphins, Oxytocin ही मन आनंदित करणारी संप्रेरके आहेत)  (3) आठ तासांची झोप ही अत्यंत गरजेची आहे. झोपी जाण्यापूर्वी केलेल्या अभ्यासाचा आढावा घेत झोपी जावे. याने जागृत मनामध्ये असलेल्या अभ्यासाला तुम्ही अंतर्मनापर्यंत पोहोचवत आहात आणि अंतर्मनात गेलेली कुठलीही गोष्ट विसरली जात नाही. बीटा वेव्ज ते अल्फावेव्ज असा हा प्रवास असतो. (4) झोपायच्या जागेवर किंवा कॉटवर बसून अभ्यास कधीही करू नका (5) दिवसातून किमान पाचदा अशी कल्पना करा की तुम्ही आनंदाने अभ्यास करत आहात, अभ्यास करत असताना तुम्हाला खूप आनंद होत आहे, परीक्षेत तुम्ही अगदी मजेत पेपर लिहीत आहात. तुमचा रिझल्ट खूप छान लागला आहे (याला लॉ ऑफ अट्रक्शन म्हणतात.)  चला तर मग परीक्षांना हसत हसत सामोरे जाऊया. गुड लक !

मेष:

तापलेल्या वातावरणाचा परिणाम तब्येतीवर होऊ शकतो. चुकीचे खाणे पिणे टाळावे. धनप्राप्तीमध्ये कमी होईल. कुटुंबीयांमध्ये वाद संभवतो. कामाच्या ठिकाणी अधिक कष्ट करावे लागतील. कामाकरता प्रवास घडेल. शेअर्समध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल. प्रेमप्रसंग यशस्वी होतील. शत्रु बदनाम करण्याचा प्रयत्न करतील.

उपाय: तांब्याचे पात्र दान द्यावे

वृषभ:

 पाण्याच्या ठिकाणी प्रवास करण्याचा योग आहे. कुटुंबासोबत आनंद प्राप्त कराल. जे लोक शेअर बाजारात काम करतात किंवा गुंतवणूक करतात त्यांना सावध राहण्याची गरज आहे. प्रेमप्रकरणात गैरसमजामुळे दुरावा येऊ शकतो. नोकरदार वर्गाला उत्तम संधी प्राप्त होतील. गुप्त शत्रूंपासून सावध राहा.

उपाय : कुमकुम घातलेल्या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यावे

मिथुन:

पैशांना योग्य ठिकाणी गुंतवले तर फायदा होईल. कुटुंबात छोट्या-मोठ्या गोष्टींवरून वाद होऊ शकतो. आपल्या वैवाहिक जोडीदाराला आनंद व्हावा म्हणून विशेष प्रयत्न कराल. मित्रांसोबत सहलीला जाण्याची योजना आखाल. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी चार चौघांचा सल्ला घ्यावा.

उपाय  : तळहातावर लाल स्वस्तिक काढावे

कर्क:

व्यापाराच्या दृष्टीने हा आठवडा सर्वसामान्य असेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष दिले तर यश मिळण्याची शक्मयता आहे. सध्या प्रवास टाळावा. शेअर मार्केटपासून दूर रहा. नोकरीमध्ये वरिष्ठांचा त्रास संभवतो. वैवाहिक जीवनात ताणतणाव अनुभवाला येईल. अचानक धनप्राप्तीचे योग आहेत. अपघातापासून सावध रहा. मानसन्मान प्राप्त होईल.

उपाय : काजळाची डबी जवळ ठेवावी

सिंह:

सध्या कोणतेही मोठे काम घेणे टाळावे. छोटे मोठे आजार त्रास देऊ शकतात. कामाच्या ठिकाणी थोड्या अडचणींचा सामना कराल. कुटुंबीयांची साथ मिळेल. प्रवास टाळावा. शेअर बाजारापासून दूर रहावे. नोकरदार वर्गाला शाबासकी मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल. लहान-मोठ्या अपघातापासून सावध राहावे.

उपाय : दत्त दर्शन घ्यावे

कन्या:

लोकांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. आरोग्याचा पाया चांगला असेल. धनप्राप्ती करता विशेष प्रयत्न करावे लागतील. कुटुंबात जेष्ठ व्यक्तीविषयी मतभेद संभवतो. येणाऱ्या काळात नोकरदार वर्गाने विशेषत: सावध राहण्याची गरज आहे. तुमच्याविषयी  चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न होईल.

उपाय : शंकराला जलाभिषेक करावा

तुळ:

आरोग्य चांगले असेल. आर्थिकदृष्टीने अनुकूल काळ आहे. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. आपल्या मधुर वाणीमुळे लोकांची मने जिंकाल. प्रवासाचे उत्तम योग आहेत. प्रॉपर्टीसंबंधी वाटाघाटी सध्या टाळाव्यात. नोकरदार वर्गाला राजकारणामुळे त्रास होईल. तीर्थयात्रा कराल.

उपाय : हळदीचा टिळा लावावा

वृश्चिक: 

नोकरदार वर्गाला सावध राहण्याची गरज आहे . धनप्राप्ती सध्या जेमतेमच असली तरी पुढे चांगले योग होत आहेत. कामानिमित्त प्रवासात चांगल्या ओळखी होतील. लेखनकार्यामध्ये यश प्राप्त होईल. प्रॉपर्टीसंबंधी विवाद असतील तर त्यामध्ये  समझोत्याचे योग आहेत. शेअर बाजारापासून दूर रहावे. 

उपाय : भटक्मया कुत्र्यांना अन्न द्यावे

धनु:

बहिणीचे सहकार्य मिळेल. आरोग्याची चिंता राहील. प्रवास टाळावा. वृद्ध व्यक्तीशी भांडण होण्याची शक्मयता आहे. जमिनीचे व्यवहार टाळावेत. शेअर्समधून लाभ संभवतो. नोकरदारांना प्रमोशनचे योग आहेत. वैवाहिक जीवनात तणाव असेल. भाग्याची उत्तम साथ आहे. कर्तबगारीमध्ये वाढ होईल.

उपाय : दुपारी बारा ते एकच्या दरम्यान दत्त दर्शन घ्यावे.

मकर:

तब्येतीची साथ राहील. घरामध्ये वाद होण्याची शक्मयता आहे. धनप्राप्तीकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. प्रवास घडेल. जमिनीच्या वादामध्ये यश मिळेल. वाहन खरेदीचे योग आहेत. छोट्या गुंतवणुकीतून मोठा लाभ होण्याची शक्मयता आहे. प्रेमप्रसंगात यश मिळेल. नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत. आपले काम चोख करावे.

उपाय : बांधकाम मजुरांना ताक द्यावे

कुंभ:

वातावरणामुळे तब्येतीच्या तक्रारी होतील. घरातील वातावरण चांगले असेल. पैशांची आवक उत्तम राहील. कामानिमित्त प्रवास घडून शकतो. भावंडांचे सहकार्य मिळेल. ज्येष्ठ स्त्रीशी मतभेद होऊ शकतात. शेअर्समधून लाभ होईल. नोकरीमध्ये कामाचे कौतुक होईल. वैवाहिक जीवनात आनंद असेल.

उपाय : सार्वजनिक ठिकाणी पाण्याची सोय करावी

मीन :

इच्छित वस्तूची प्राप्ती होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. धनप्राप्ती उत्तम असेल. प्रवासाचे चांगले योग बनताहेत. भावंडांचे सहकार्य मिळेल. जमीन आणि वाहन प्राप्तीचे योग आहेत. गुंतवणुकीतून फायदा होईल. गुप्त शत्रूंचा त्रास कमी होईल. चहाडी करणाऱ्यांची तोंडे बंद होतील. व्यवसायामध्ये नाव कामवाल.  लाभाची शक्मयता जास्त आहे.

उपाय :  मुक्या जनावरांना खाणे द्यावे.

Related Stories

आजचे भविष्य सोमवार दि. 16 जानेवारी 2023

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 11 जानेवारी 2020

Patil_p

आजचे भविष्य 21-01-2022

Amit Kulkarni

आजचे भविष्य शुक्रवार दि. 4 डिसेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 5 सप्टेंबर 2022

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 19 फेब्रुवारी 2022

Patil_p