13-04 ते 19 -04 -2022 पर्यंत
भीमरूपी महारुद्रा!!!
महा तपस्वी रावणाने आपले मुक्ती रूपी शेवटचे वरदान महादेवांकडे मागितले आणि महादेवांनी श्रीराम प्रभुंच्या रूपाने ते त्याला दिलेही. दास्य भक्तीचा सर्वोच्च आविष्कार म्हणून चैत्र पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी कर्नाटकातल्या हंपीजवळ पूर्व क्षितिजावरती मेष रास असताना अंजनीच्या पोटी महारुद्र हनुमानाचा जन्म झाला. काहींच्या मतानुसार तमिळनाडू आणि केरळ प्रांतात मार्गशीर्ष अमावास्या हा हनुमानाचा जन्म मानला जातो. ओडिशात वैशाख प्रतिपदेला हनुमान जयन्ती मानली जाते. उत्तरेकडे नरक चतुर्दशी (ज्या दिवशी मंगळवार होता स्वाती नक्षत्र होते आणि मेष लग्न होते) दिवशी हनुमानाचा जन्म मानला जातो. एका कथेनुसार जन्मानंतर हनुमानाने सूर्याला फळ समजून झेप घेतली आणि त्यावेळी सूर्याला ग्रहण लावण्याकरता राहू तेथे जात होता. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्या दिवशी ग्रहण होते. म्हणजेच चैत्र पौर्णिमा हा हनुमानाचा जन्म सयुक्तिक वाटतो. मतीमान, श्रुतीमान, केतूमान, गतिमान आणि ध्रुतीमान या बंधुंसोबत हनुमानाला मकरध्वज नावाचा मुलगाही होता. संपूर्ण ब्रह्मचारी असूनही पौराणिक मान्यतेनुसार हनुमानाचे तीन विवाह झाले. पहिली पत्नी सुवर्चला जी सूर्याची मुलगी होती. हनुमान आणि सुवर्चलाचे मंदिर तेलंगणा येथील खम्माम येथे आहे. दुसरी पत्नी अनंगकुसुमा जी रावणाची मुलगी होती आणि तिसरी पत्नी सत्यवती जी वरुणाची मुलगी होती. साक्षात सूर्यदेवाला जरी हनुमानाचे गुरु मानले जाते तरी ऋषी मणिंद्र हे त्यांचे व्यावहारिक गुरु होते असे एक पौराणिक कथा सांगते. येत्या सगळय़ा प्रकारच्या मंत्रतंत्रांमध्ये हनुमान उपासनेला अत्यंत महत्त्व आहे. 16 तारखेला आपण हनुमान जयंती साजरी करणार आहोत. त्यादिवशी संकल्पपूर्वक जर खालील स्तोत्रांचे पाठ केले तर आपल्याला निश्चितच फायदा होऊ शकतो. सगळय़ा प्रकारची कामे होण्याकरता हनुमान चालीसाचे शंभर पाठ एका बैठकीत करावे. बजरंग बाण हे एक प्रमुख स्तोत्र आहे पण त्याचे खरे स्वरूप फार कमी लोकांकडे आहे. त्याचेही रोज अकरा पाठ केले तर सगळय़ा प्रकारच्या बाधांपासून, शत्रूपिडेपासून मुक्तता मिळते. कोणत्याही प्रकारच्या वेदनेपासून मुक्तता मिळवण्याकरता हनुमान बाहुक हे स्तोत्र अत्यंत उपयोगी आहे. समर्थांनी लिहिलेले भीमरूपी स्तोत्र हे मराठी माणसाला वरदानच आहे. असे कोणतेही काम नाही जे याने पूर्ण होत नाही. हनुमान वडवानल स्तोत्र पठणाने इच्छित मनोकामना पूर्ण होते. हनुमान वज्रकवच हे खरोखर एका कवचाप्रमाणे काम करते. पंचमुखी हनुमान कवच हे सर्वश्रे÷ मंत्रांपैकी आहे. याबाबतीत एक इशारा द्यावसा वाटतो की कोणत्याही प्रकारे शाबर मंत्र सिद्ध करण्याच्या भानगडीत न पडलेले बरे कारण त्यात देवतेला शपथ दिली जाते आणि हे कदापि योग्य नाही. रुईच्या पाना बरोबरच वडाचे पानही हनुमानाला प्रिय आहे. लाल पुष्प, केवडय़ाचे अत्तर, बुंदीचा लाडू, पानविडा, लाल वस्त्र हेही हनुमानाला अत्यंत प्रिय आहे. हवेतील इथर या पदार्थावर सत्ता असल्याने सगळय़ा प्रकारच्या चांगल्या वाईट शक्ती, भुताखेतांवर हनुमानाचेच राज्य असते. त्याची उपासना करूया, भवसागर पार करूया.
महा उपायः पित्रू पिडा किंवा प्रगती खुंटली असता खालील उपाय करावा. पौर्णिमेदिवशी सातूच्या पिठाचा एक पिंड, भाताचा एक पिंड आणि काळे तीळ मिसळलेल्या भाताचा एक पिंड घेऊन त्याची जमेल तशी पूजा करावी. उरलेला भात कावळय़ांना घालावा. तिन्ही पिंडांवरती काळय़ा तिळासोबत पाणी सोडावे आणि तिन्ही पिंड वाहत्या पाण्यात सोडावेत.
सोपी वास्तु टिपः पिंजऱयातले पक्षी, जिवंत कासव किंवा एक्वेरियम (माशांची टाकी) घरी असू नये.
मेष
मानसिक ताण-तणावांचा परिणाम तब्येतीवर होऊ शकतो. खाण्यापिण्याच्या सवयीमुळेसुद्धा तब्येत बिघडू शकते. पैशांच्या देवाण-घेवाण संदर्भात कुटुंबात वाद उद्भवू शकतो. कामासाठी केलेला प्रवास यशस्वी ठरेल. नोकरदार वर्गाला जास्त कष्ट करावे लागतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर वाद उद्भवू शकतो. मानसन्मान मिळेल. उपाय- चार दुर्वांना हळद लावून गणपतीला अर्पण कराव्यात.
वृषभ
जवळच्या व्यक्तीबरोबर झालेल्या वादामुळे मन खिन्न असेल. पैशांची आवक चांगली असेल. परिवारातील सदस्यांची उत्तम साथ लाभेल. शक्मयतो प्रवास टाळावा. तब्येत बिघडू शकते. स्थावर संपत्तीच्या दृष्टीने काळ चांगला आहे. छोटय़ा गुंतवणुकीतून फायदा. नोकरदार वर्गावर खोटा आरोप होऊ शकतो. वैवाहिक जीवन समाधानी. भाग्याची उत्तम साथ मिळेल. उपाय- सरकारी आवारात तीन हळदीच्या गाठी ठेवून द्याव्यात.
मिथुन
कार्यसिद्धी सहजपणे होईल. आरोग्य उत्तम असेल. पैशांची विवंचना सतावेल. छोटय़ा प्रवासाचे योग आहेत. वाहन खरेदीच्या दृष्टीने उत्तम योग आहेत. प्रेम प्रसंगात मनस्ताप संभवतो. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील. वाहन जपून चालवावे. लाभाकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. उपाय- कुमारी पूजन करावे
कर्क
आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उसनी दिलेली रक्कम परत मिळवण्याकरता प्रयत्न कराल. परिवारात छोटेखानी समारंभ घडू शकतो. घरच्यांची मदत मिळेल. प्रवासातून लाभाची शक्मयता आहे. लेखी व्यवहार यशस्वी होतील. नोकरदार वर्गाला कष्टाचे फळ मिळेल. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ असेल. मंगल कार्याकरता खर्च होईल. उपाय- उसाच्या रसाने महादेवाला अभिषेक घाला.
सिंह
आरोग्याचा पाया मजबूत असेल. स्वतःकरता खर्च कराल. पैसे साठवण्याकडे कल असेल. निर्णय घेताना घरच्यांचे मत विचारात घ्याल. प्रवासात नुकसान संभवते. स्थावर मालमत्तेची चिंता मिटेल. शेअर्ससारख्या गुंतवणुकीतून लाभाची शक्मयता आहे. प्रेमप्रकरणात यश मिळेल. नोकरदार वर्गाला प्रमोशनचे योग आहेत. वैवाहिक जीवनात ताण तणाव संभवतो. उपाय- तांब्याचे कडे दान करावे
कन्या
ध्येय प्राप्ती करता गैरमार्गाचा वापर टाळावा. मनातील इच्छा पूर्ण होईल. क्षुल्लक गोष्टींवरून घरात वाद संभवतो. भावाचे सहकार्य मिळेल. जमिनीचे व्यवहार यशस्वी होतील. प्रेमसंबंधांमध्ये वाढ होईल. मनोरंजनाकडे कल असेल. नोकरदार वर्गाला वरि÷ांचा त्रास होऊ शकतो. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग संभवतात. मानसन्मान वाढेल. उपाय- ईशान्य दिशेला कडुनिंबाचे झाड लावावे
तूळ
तुम्ही दिलेल्या सल्ल्याचा लोक गैरफायदा घेऊ शकतात. धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडतील. बँकेतल्या ठेवींमध्ये वाढ होईल. प्रवासाचे उत्तम योग आहेत. आणि त्यातून फायदाही संभवतो. लेखी व्यवहारात यश. जमिनीच्या व्यवहारातून फायदा मिळेल. धोकादायक गुंतवणूक अजिबात करू नये. जोडीदाराशी मतभेद झाल्याने त्रास होईल. भाग्याची साथ चांगली आहे. उपाय- चंदनाचा टिळा लावावा
वृश्चिक
बरेच दिवस मनात रेंगाळत असलेले एखादे काम पूर्ण होईल. तब्येतीची साथ मिळेल. पैशांची आवक उत्तम असेल. परिवारात हसते खेळते वातावरण असेल. प्रवासामुळे फायदा होईल. शेअर्ससारख्या गुंतवणुकीपासून दूर रहा. नोकरदार वर्गाला प्रतिकूल काळ आहे. वैवाहिक जीवनात ताण. महत्त्वाची बातमी समजेल. धार्मिक कार्याला खर्च कराल. उपाय-संध्याकाळी घरात गुग्गुळ धूप लावावा
धनु
तुमच्या कष्टांची दखल घेतली जाईल. सहकाऱयांच्या सहयोगामुळे अवघड काम करू शकाल. कामाच्या ठिकाणी गोंधळ होऊ शकतो. धनप्राप्ती उत्तम असेल. आरोग्याची साथ चांगली असेल. प्रवास टाळा. जमिनीचे व्यवहार पुढे ढकलावे. प्रेमसंबंधात तणाव येईल. नोकरीत मनस्तापाची संभावना आहे. वैवाहिक जीवन सुखमय असेल. मित्रांवर छाप पाडाल. उपाय- घरी श्रीसुक्ताची आवर्तने करून घ्यावी.
मकर
कष्टकऱयांना उचित मोबदला मिळेल. कामाच्या ठिकाणी वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न कराल. आरोग्य सुधारेल. परिवारात असंतोषाचे वातावरण असू शकते. नोकरदार वर्गाला अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवनात ताण-तणावाचे वातावरण असेल. धार्मिक स्थळाला भेट द्याल. मानसन्मानात वाढ होईल. खर्चाचे प्रमाण वाढलेले असेल. उपाय- शंकराला एक मूठ अखंड तांदूळ अर्पण करा
कुंभ
तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. बदललेल्या वातावरणाचा परिणाम तब्येतीवर होऊ शकतो. धनप्राप्तीकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी वाद संभवतो. प्रवास शक्मयतो टाळावा. शेअर्समधून लाभ होईल. नोकरदार वर्गाने आपले काम चोख करावे. वैवाहिक जीवनात समाधान असेल. सगळय़ा प्रकारचे लाभ होतील. उपाय-मारुतीला मधाने अभिषेक करावा
मीन
दुसऱयांसाठी राबण्यापेक्षा स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणे जास्त हितावह ठरेल. कुटुंबातील व्यक्तींवर नाराज असाल. मनाप्रमाणे धनप्राप्ती न झाल्यामुळे मन उदास होऊ शकते. जमिनीचे व्यवहार यशस्वी होतील. धोकादायक गुंतवणुकीपासून दूर राहावे. नोकरदार वर्गाला कष्टाचे फळ मिळेल. वैवाहिक जीवन समाधानकारक असेल. भाग्य अनुकूल आहे. नावलौकिक वाढेल. उपाय- गुरुवारी दुपारी दत्त दर्शन घ्यावे.