Tarun Bharat

एड्सबाधित-सामान्य व्यक्तींमधील दरी दूर झाली पाहिजे

प्रतिनिधी / बेळगाव

एड्सबाधित आणि सामान्य व्यक्तींमधील दरी दूर झाली पाहिजे. एचआयव्ही बाधित व्यक्तीची अवहेलना थांबविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अथक प्रयत्नाने हा रोग आटोक्मयात येत असून बेळगाव जिल्हा हा कर्नाटकात अव्वल ठरला आहे, असे प्रतिपादन आयएमए बेळगाव शाखेच्या अध्यक्षा डॉ. सपना महाजन यांनी मांडले.

जायंट्स मेन आणि आयएमए बेळगाव शाखेच्यावतीने जागतिक एड्स दिनानिमित्त महांतेशनगर येथील आश्र्रय फौंडेशन येथे आयोजित जागृती कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ, विशेष समिती सदस्य मोहन कारेकर, आयएमए लेडीज विंग अध्यक्षा डॉ. मंजुषा गिजरे, फेडरेशन संचालक मदन बामणे, सचिव मुकुंद महागावकर आणि आश्र्रय फौंडेशनच्या सल्लागार सदस्या प्रविणा सुशीलकुमार या उपस्थित होत्या.

मोहन कारेकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगून उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर डॉ. गिजरे यांनी एड्स हा रोग थोपविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले पाहिजेत, तसेच नियमित योग्य त्या औषधोपचाराने रोगावर नियंत्रण ठेवता येते, असे सांगितले. मदन बामणे यांनी आपले विचार व्यक्त केले.

शिवकुमार हिरेमठ यांनी आश्र्रय फौंडेशनच्या कार्याची प्रशंसा केली. तत्पूर्वी जायंट्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षा शायना एन. सी. आणि मदन बामणे यांच्या वाढदिवसानिमित्त केक वाटप करण्यात आले आणि दैनंदिन वापरासाठी पौष्टिक आहार वितरित करण्यात आला. शेवटी प्रविणा सुशीलकुमार यांनी जायंट्स मेन आणि आयएमएचे आभार मानले. 

Related Stories

बेळगावमध्ये पार पडले सामूहिक ढोलताशा वादन

Amit Kulkarni

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Tousif Mujawar

तिसऱया रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे काम वेळेत होणे अशक्मय

Patil_p

महांतेश कवटगीमठ यांची पोस्ट कार्यालयाला भेट

Amit Kulkarni

वडगावमध्ये म्हैस पळविण्याच्या शर्यतीला अमाप प्रतिसाद

Amit Kulkarni

आरपीडी कॉलेजमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

Amit Kulkarni