Tarun Bharat

कोयना धरणाचे दरवाजे दीड फुटाने उचलले

प्रतिनिधी/ नवारस्ता

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कमी झालेला पावसाचा जोर पुन्हा वाढल्यामुळे वीस दिवसांपूर्वी बंद करण्यात आलेले कोयनेचे सहा वक्र दरवाजे मंगळवारी दुपारी पुन्हा दीड फूट उचलून कोयना नदीपात्रात 14 हजार 198 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

   गेल्या चार दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढू लागल्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवकही वाढली आह.s परिणामी धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी दुपारी दोन वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट पाच इंच उचलून कोयना नदीपात्रात 13 हजार 139 क्युसेक आणि धरणाच्या पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्युसेक असे मिळून 14 हजार 189 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याने कोयना, कृष्णा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मंगळवारी सायंकाळ पर्यंत धरणात 102.32 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरणात प्रतिसेकंद  18 हजार 275 क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली आहे.

दरम्यान मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना येथे 71 (4212), नवजा येथे 79 (5116) आणि महाबळेश्वर 34 (5410) येथे मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

आजपासून पुन्हा विसर्ग वाढविणार.!

दरम्यान कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पर्जन्य आवक वाढल्याने उद्या बुधवार 14 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9ः00 वाजता कोयना धरणाचे 6 वक्रदरवाजे 3 फुट 6 इंच उघडून 31,710 क्युसेक्स विसर्ग सोडणेत येणार आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Related Stories

कलानगर पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; उद्धव ठाकरे म्हणाले…

Tousif Mujawar

MPSC : राज्यसेवा ​​​​​​​परीक्षा स्थगित

Abhijeet Khandekar

पदोन्नतीतील आरक्षण रद्दचा निर्णय मागे ; ठाकरे सरकारचा निर्णय

Archana Banage

स्वच्छतेसाठी आरोग्य विभाग मध्यरात्रीही तत्पर

Patil_p

खुपिरे राष्ट्रीय पेयजल योजनेचे खासदार मंडलिक यांच्या हस्ते उद्घाटन

Archana Banage

सातारा जिल्ह्यासाठी गृह विलगीकरण उपाययोजना पुस्तिकेचे आरोग्यमंत्र्याच्या हस्ते प्रकाशन

Archana Banage