Tarun Bharat

अमरावती लव्ह जिहाद प्रकरणातील युवती अखेर सापडली

Advertisements

सातारा / प्रतिनिधी :

Amravati Love Jihad : अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील एका महाविद्यालयीन युवतीला फूस लावून पळवून नेऊन तसेच तिचे ब्रेन वॉश करुन तिच्याशी आंतरधर्मीय विवाह केल्याचे समोर आले होते. त्यामुळे अमरावतीसह राज्यभरातील वातावरण स्फोटक बनले होते. याच धर्तीवर बुधवारी रात्री उशिरा संबंधित मुलगी सातारा येथील रेल्वे स्थानकात सापडली असून रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील एका युवतीचे अपहरण करुन तिच्याशी आंतरधर्मीय विवाह केल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले होते. विवाहानंतर संबंधित मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी केला होता. तसेच पोलिसांनी पीडित मुलीला पोलीस ठाण्यात आणावे, अशी मागणी केली होती. हे प्रकरण लव्ह जिहादचे असल्यामुळे या प्रकरणात स्थानिक खासदार नवनीत राणा तसेच राज्य सभेचे खासदार अनिल बोंडे यांनी उडी घेतल्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळले होते. बुधवारी दुपारी खासदार राणा यांनी पोलीस ठाण्यात जावून पोलिसांशी हुज्जत घातली होती. बनावट कागदपत्रांच्या आधारे लग्न लावून दिल्याचा आरोपही राणा यांनी केला होता. 

दरम्यान, हे प्रकरण ताजे असतानाच आज रात्री उशिरा सातारा येथील रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी पीडित युवतीस ताब्यात घेतले. संबंधित युवतीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी सहा तासांचा पाठलाग केल्याचे समोर आले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला नव्हता. तसेच यासंदर्भात माहिती देण्याचेही पोलिसांनी टाळल्याने याबाबतची सखोल माहिती अद्याप हाती आलेली नाही. परंतू गेल्या काही दिवसांपासून अमरावतीसह राज्यभरात चर्चिले गेलेल्या लव्ह जिहादचा गौप्यस्फोट सातार्‍यात झाल्याने संबंधित युवती तसेच संशयिताची विचारपूस केल्यानंतर याबाबतची अधिक माहिती मिळणार आहे.

Related Stories

कोरोना संकटात 80 लाख भारतीयांनी EPFO मधून काढले तब्बल 30 हजार कोटी

datta jadhav

उत्तर प्रदेशमध्ये डेल्टा नंतर आढळले कप्पा विषाणूचे रुग्ण!

Tousif Mujawar

सातारा : जिल्हा परिषदेत 32 जणांना पदोन्नती

datta jadhav

कराड येथील एक प्रवासी कोरोना बाधित

Archana Banage

उत्तराखंड : मास्क न वापरल्यास होणार 5 हजार रुपयांचा दंड

Tousif Mujawar

सहा दिवसात 88 तर तीन दिवसात 89 रूग्ण

datta jadhav
error: Content is protected !!