प्रतिनिधी /पणजी
राज्याचे ड्रोन धोरण आखण्यासंदर्भात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हल्लीच केलेली घोषणा आता सत्यात उतरली असून आज मुक्तीदिनी ’गोवा ड्रोन धोरण 2022’ जाहीर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ’ऍडिटिव्ह मॅन्युपॅक्चरिंग हब’ चेही उद्घाटन करण्यात येणार आहे.
आल्तीनो पणजी येथील आयटी हब इमारतीत सायंकाळी 4 वाजता होणाऱया कार्यक्रमात मुख्यमंत्री ड्रोन धोरण जाहीर करतील. तसेच मॅन्युपॅक्चरिंग हब चे उद्घाटन करतील. या कार्यक्रमास मंत्री रोहन खंवटे, आमदार तथा इन्फोटेक महामंडळाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत शेटय़े, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, आयटी सचिव संजीव आहुजा, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.