Tarun Bharat

ब्रिटन-चीन संबंधांचा सुवर्णकाळ संपुष्टात

पंतप्रधान ऋषी सुनक यांची मोठी घोषणा ः भारतासोबत करणार मुक्त व्यापार करार

@ वृत्तसंस्था / लंडन

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी चिनी ड्रगनवर मोठा प्रहार केला आहे. ब्रिटन आणि चीन यांच्यातील संबंधांचा सुवर्णकाळ आता संपुष्टात आला आहे. चीनने ब्रिटनची मूल्ये आणि हितांसाठी आव्हान निर्माण केले असल्याचे उद्गार पंतप्रधान सुनक यांनी काढले आहेत. शांघायमध्ये निदर्शनांचे वृत्तांकन करणाऱया बीबीसी पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी सुनक यांनी चीनची निंदा केली आहे. हिंद-प्रशांत क्षेत्रासोबत ब्रिटन स्वतःचे संबंध बळकट करणार आहे. तसेच भारतासोबतच्या मुक्त व्यापार कराराला मूर्त स्वरुप देणार असल्याचे सुनक यांनी म्हटले आहे.

ब्रिटन आणि चीन यांच्यातील संबंधांचा सुवर्णकाळ संपुष्टात आला आहे. याचबारेबर व्यापाराद्वारे आपोआप सामाजिक आणि राजकीय सुधारणा होतील हा विचारही संपुष्टात आला आहे. ब्रिटनला चीनबद्दल स्वतःचा दृष्टीकोन विकसित करावा लागणार आहे. चीन स्वतःच्या शक्तीचा वापर जगात प्रभाव वाढविण्यासाठी करत आहे. आमचे सरकार हिंद-प्रशांत क्षेत्रातील सहकाऱयांसोबत व्यापार आणि सुरक्षा संबंध मजबूत करण्यावर प्राथमिकता देणार असल्याचे सुनक म्हणाले.

हिंद-प्रशांत क्षेत्रात अर्थव्यवस्था आणि सुरक्षेला वेगवेगळे करता येणार नसल्याचे सुनक यांनी नमूद पेले आहे. यापूर्वी सुनक हे स्वतःच्या पक्षातील नेत्यांकडून लक्ष्य ठरले होते. माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या तुलनेत सुनक हे कमी कठोर भूमिका अवलंबित असल्याचा आरोप या नेत्यांनी केला होता. तर लिझ ट्रस यांच्याविरोधातील दावेदारीदरम्यान सुनक यांनी चीनविरोधात अत्यंत कठोर भूमिका स्वीकारणार असल्याचे आश्वासन दिले होते. सुनक यांनी चीनला ब्रिटन तसेच जागतिक सुरक्षेसाठीचा सर्वात मोठा धोका ठरविले होते.

जी-20 शिखर परिषदेदरम्यान सुनक आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात बैठक होऊ शकली नव्हती. ब्रिटनने चीनमध्ये निर्मित सुरक्षा कॅमेऱयांचा संवेदनशील शासकीय इमारतींमध्ये वापर करण्यास बंदी घातली आहे. तर दुसरीकडे सुनक यांनी भारतासोबत मुक्त व्यापार करारावरून ब्रिटनची प्रतिबद्धता पुन्हा अधोरेखित केली आहे. भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक यांनी पंतप्रधान पद स्वीकारल्यावर पहिल्यांदाच विदेश धोरणासंबंधी भाषण केले आहे.

2015 मधील धोरण संपुष्टात येणार

सुनक यांनी मंगळवारी ब्रिटन अन् चीन संबंधांवर निर्माण धोरण रद्द करण्याचे संकेत दिले आहेत. हे धोरण 2015 मध्ये तयार करण्यात आले होते.  चीनसोबत व्यापारामुळे तेथे कुठलाही सामाजिक किंवा राजकीय बदल घडून येणार नसल्याचे सुनक यांनी म्हटले आहे. चीनसोबतच्या संबंधांवरून ‘गोल्डन एरा पॉलिसी’ 2015 मध्ये तयार करण्यात आली होती. याची घोषणा क्षी जिनपिंग यांच्या ब्रिटन दौऱयापूर्वी ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी केली होती.  या धोरणाचा उद्देश दोन्ही देशांमधील संबंध वृद्धींगत करण्यासह व्यापार वाढविणे होता.

बीबीसी पत्रकाराला अटक

शांघायमध्ये  निदर्शनांचे वृत्तांकन करणारे बीबीसीचे पत्रकार एड लॉरेन्स यांना चीनच्या पोलिसांनी अटक केली होती. लॉरेन्स यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली होती. त्यांचे हात बांधून पोलिसांनी त्यांना बडविले होते. याप्रकरणी ब्रिटनने चीनसमोर संताप व्यक्त केला आहे.

Related Stories

पेरूमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 9 लाखांचा टप्पा

datta jadhav

20 जुलैला अंतराळात जाणार जेफ बेजोस

Patil_p

जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लसीला मंजुरी

Patil_p

अमेरिकेची मूलनिवासी महिला मंत्रिमंडळात?

Patil_p

अफगाणिस्तानात पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून लूट

datta jadhav

इंग्लंडमध्ये महात्मा गांधींच्या घड्याळाचा लिलाव

datta jadhav