Tarun Bharat

श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवाची मुहूर्तमेढ

10, 11 रोजी होणार महोत्सव

प्रतिनिधी/ येळ्ळूर

श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ व श्री चांगळेश्वरी हायस्कूल यांचा संयुक्त सुवर्णमहोत्सव 10 व 11 डिसेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी मुहूर्तमेढ रोवण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वाय. एन. मजुकर होते.

सुवर्णमहोत्सवाला भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत. प्रभात फेरी, सभा, कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध शाहीर धोंडीराम मगदूम आणि पार्टी यांचे पोवाडे लावण्यात येणार आहेत. यामध्ये विद्यार्थीही भाग घेणार आहेत. या सुवर्णमहोत्सवाला पुणे विभाग शिक्षणप्रतिनिधी, आमदार तसेच बेळगाव व खानापूर येथील आजी-माजी आमदारांना निमंत्रित करण्यात आले आहे.

निवृत्त मुख्याध्यापक बी. बी. पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. वाय. एन. मजुकर यांच्या हस्ते चांगळेश्वरी प्रतिमेचे पूजन करण्यात आले. माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मजुकर, संचालिका कांचन मजुकर, संचालक नरेंद्र मजुकर, सचिव प्रसाद मजुकर, येळ्ळूरवाडी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक मोहन पाटील, शारिरीक शिक्षण शिक्षक सतीश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर यांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवण्यात आली. कार्यक्रमाला संचालक के. एल. हुंद्रे, चंद्रकांत पाटील, साईनाथ देसाई, उपाध्यक्ष दौलत कुगजी, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रामदास धुळजी, कार्याध्यक्ष चेतन हुंदरे, मुख्याध्यापक जे. एम. पाटील, एस. एम. येळ्ळूरकर, अरुण पाटील, पी. ए. पाटील, आर. बी. पाटील, ए. डी. धामणेकर, आय. बी. राऊत यांच्यासह सर्व शाळांचे शिक्षक व शिक्षणप्रेमी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व्ही. एल. कांबळे यांनी केले. टी. एस. बोकडेकर यांनी आभार मानले.

Related Stories

हेस्कॉमच्या कारभारामध्ये सुधारणा करा

Patil_p

शिवप्रतिष्ठानतर्फे शिवजन्मोत्सव साधेपणाने साजरा

Patil_p

वाहतूक रोखण्यासाठी संपर्क रस्त्यांवर झाडांचा वापर

tarunbharat

बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ, अमृत पोतदार सीसीआय संघांचे विजय

Amit Kulkarni

कोल्हापूरपेक्षा बेळगावमध्ये 9 रुपयांनी पेट्रोल स्वस्त

Patil_p

त्या’ नराधमांना फाशी द्या, सरकारने राजीनामा द्यावा

Patil_p