Tarun Bharat

सोन्याच घुबडाचा ध्यास

फ्रान्समध्ये 30 वर्षांपासून सुरू आहे ट्रेझर हंट गेम

जगातील सर्वात लांबलेल्या गेमचे रहस्य 11 कोडय़ांमध्ये लपलेले

Advertisements

घुबडाला भारतीय संस्कृतीत देवतेचे वाहन मानण्यात येते आणि फ्रान्समध्ये मागील 30 वर्षांपासून घुबडाशी संबंधित ट्रेझर हंट गेम (ऑन द ट्रेल ऑफ द गोल्डन आउल प्रेंच आर्म चेयर ट्रेझर हंट) सुरू आहे. हा जगातील सर्वात लांबलेला ट्रेझर हंट गेम ठरला आहे. यात सोन्याच्या घुबडाला शोधण्याचा प्रयत्न पूर्ण फ्रान्स करत आहे.

फ्रान्समधील कादंबरीकार मॅक्स व्हॅलेंटाइन यांनी 23 एप्रिल 1993 रोजी एका गुप्त ठिकाणी सोन्याच्या घुबडाची पितळेची प्रतिकृती लपविली होती. घुबडायर्पंत पोहोचण्याची पद्धत त्यांनी स्वतःच्या कादंबरीत 11 कोडय़ांमध्ये सांगितली आहे. यात काही गणिताचे प्रश्न, भाषेचा खेळ, ऐतिहासिक संकेताच्या स्वरुपात कोडी आहेत. यात घुबडाला शोधून आणणाऱयाला सुमारे सव्वा कोटी रुपयांचे इनाम दिले जाईल.

अनेक वर्षांपासून शोध

या घुबडामध्ये एक गुप्त संदेश देखील लपलेला असून तो या घुबडाचा वारस असलेल्या खऱया सोन्याच्या घुबडात देखील आहे. यामुळे घुबड शोधून आणणाऱया व्यक्तीची सत्यता प्रमाणित झाल्यावर बक्षीसाची रक्कम देण्यात येणार आहे. घुबड शोधण्यासाठी अनेक लोकांनी स्वतःचे निम्म्याहून अधिक जीवन घालविले आहे. या गेमच्या 25 व्या वर्षी 78 वर्षीय निवृत्त इंजिनियरने या घुबडाला शोधण्यासाठी 20 वर्षे घालविल्याचा आरोप केला होता. आपण सर्व ठिकाणी शोधलो, तरीही घुबड मिळाले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कादंबरीकाराचा मृत्यू

या सोन्याच्या घुबडाला शोधण्यासाठी ए-2 सीओ गूप समोर आला आहे. 2003 मध्ये या ग्रूपच्या 165 सदस्यांनी मिळून या घुबडाला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु तेही अपयशी ठरले आहेत. पुस्तकाचे लिखाण केल्याच्या 16 वर्षांनी कादंबरीकाराचा मृत्यू झाला होता.

Related Stories

जुने छायाचित्र शेअर केल्याने राहुल गांधी लक्ष्य

Patil_p

प्रचंड यांनी मागितली भारत, अमेरिकेकडून मदत

Patil_p

नेदरलँड्स अन् बेल्जियमकडून रशियावर कारवाई

Patil_p

शतकाच्या मध्यापर्यंत कार्बन उत्सर्जन थांबविणार

Patil_p

उत्तर कोरियाने बनवले लांब पल्ल्याचे ‘इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक’ क्षेपणास्त्र

datta jadhav

नेल-पॉलिश लावल्यास बोटं कापू

Patil_p
error: Content is protected !!