तरुण भारत

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचविण्यासाठी सरकार कटिबद्ध

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन, यंदापासून कोडिंग, रोबोटींग विषय सुरू करणार, दाडाचीवाडी धारगळ येथील सरकारी हायस्कूलला फोर्सा गोवा फाऊंडेशनतर्फे मदत

प्रतिनिधी /पेडणे 

Advertisements

राज्यातील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी कोडिंग आणि रोबोटींग हा विषय येत्या जून पासून 525 सरकारी आणि अनुदानित विद्यालयामध्ये सुरू करण्यात येणार आहे.  आधुनिक तंत्रज्ञान तसेच अद्ययावत साधनाचा वापर करून राज्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

दाडाचीवाडी धारगळ येथील सरकारी हायस्कूलला फोर्सा गोवा फाउंडेशन तर्फे बांधण्यात येणाऱया बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर, धारगळचे सरपंच प्रदीप नाईक, फोर्सा गोवा फाउंडेशन प्रमुख जयदेव मोदी, आशिष कपाडीया, मुख्याध्यापिका ऍना डीसा आदी उपस्थित होते.

फोर्सा गोवा फाउंडेशन (एफजीएफ) या तळागाळात काम करणाऱया ना-नफा तत्त्वावरील फुटबॉल फाउंडेशनने (एफजीएफ) 2022 मध्ये एक मोठे शैक्षणिक अनुदान देण्यासाठी त्यांची सीएसआर कार्यकक्षा वाढवण्याची योजना जाहीर केली आहे. या अनुदानामुळे येत्या काही वर्षांत गोव्याच्या शिक्षणाप्रती या फाउंडेशनची सातत्यपूर्ण, शाश्वत बांधिलकी सुनिश्चित होईल, असेही मुख्यमंत्री सावंत म्हाणाले.

फोर्सा गोवा फाऊंडेशन या संस्थांच्या कार्यांमध्ये करुणा असते, त्या अर्थपूर्ण आणि मोठे सामाजिक बदल घडवून आणू शकतात. आपल्या समुदायाच्या वाढीसाठी फोर्सा गोवा फाउंडेशनचे प्रयत्न पाहून मला आनंद होत आहे. संस्थांनी देखील पुढाकार घ्यावा आणि अशा संस्थामार्फत आपल्या संस्थांना मदत करुन घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.

धारगाळ येथे शाळांमध्ये स्मार्ट रूम उभारले आहेत, ज्यामध्ये प्रोजेक्टर, कॉम्प्युटर, पिंटर आणि साऊंड सिस्टिमचा समावेश आहे. शैक्षणिक साधनांमध्ये पुस्तकांची कपाटे, बहुउद्देशीय रॅक्स, चॅकबोर्ड आणि गोष्टींची पुस्तके आहेत. क्रीडा किट्समध्ये व्हॉलीबॉल, क्रिकेट, फुटबॉल आणि बॅडमिंटन गिअर, ‘एफसी गोवा’च्या जर्सी, बुद्धिबळ सेट आणि दोरीच्या उडय़ांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार प्रवीण आर्लेकर तसेच सरपंच भूषण नाईक यांच्या हस्ते यावेळी विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य तसेच स्मार्ट रुम आणि पुस्तकाच्या कपाटाचे वितरण व उद्घाटन करण्यात आले.

250 मुले बसू शकतील असे 126.9 चौरस मीटरचे बहुउद्देशीय सभागृह पूर्णपणे नव्याने बांधले जाईल. यामध्ये या शाळेच्या तसेच आणि दाडाचीवाडी, धारगळ या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचे समारंभ, कार्यक्रम आणि सराव घेणे शक्मय होईल. त्यानंतर 2022 मध्ये, एफजीएफ त्याच भागात एक पूर्णपणे सुसज्ज जिम, एक वैद्यकीय केंद्र आणि ज्ये÷ नागरिकांसाठी करमणुकीच्या केंद्र असणार आहे. 

विद्यालयाच्या विकासासाठी तसेच जागा उपलब्ध झाल्यास ती देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. तसेच साधनसुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार आसल्याचे सांगून गेली पाच वर्षे ग्रामीण भागात असलेल्या या विद्यालयाचे निकाल शंभर टक्के लागत असल्याबद्दल मुख्याध्यापिका शिक्षक विद्यार्थी व पालकांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले, आमच्या पेडणे मतदारसंघातील विद्यार्थ्यांना त्यांचा शैक्षणिक स्तर उंचविण्यासाठी फोर्सा गोवा फाउंडेशनने पुढाकार घेऊन आज याठिकाणी विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य, पुस्तके तसेच सभागृह बांधून देणार ही आमच्यासाठी आणि गावासाठी चांगली बाब आहे. नवीन शैक्षणिक साहित्य दिल्याने या विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होऊन त्यांचा शैक्षणिक स्तर उंचाविणार असल्याचे सांगून फोर्सा गोवाला धान्यवाद दिले.

शाळेच्या मुख्याध्यापिका ऍना डीसा यांनी सांगितले की, आम्ही गेल्या काही महिन्यांपासून फोर्सा गोवा फाउंडेशनसोबत काम करत आहोत. आमच्या मुलांच्या गरजा ओळखून त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यांनी दिलेल्या भेटवस्तू आणि निर्माण केलेल्या पायाभूत सुविधा आमच्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितपणे उपयुक्त ठरतील आणि आमच्या शाळेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्या अगदी योग्य आहेत.

Related Stories

आमदारांच्या राजीनाम्याची मालिका सुरुच

Amit Kulkarni

पेडणे पोलिसांनी दुचाकी चोरटय़ांकडून 25 लाखांच्या 15 मोटारसायकली जप्त केल्या , तिघांना केली अटक

Omkar B

विठ्ठलापूर सांखळीत आजपासून विष्णुयाग अनुष्ठान

Amit Kulkarni

गोव्याचा दुसरा ग्रँडमास्टर लिऑन मेंडोंसाचे गोव्यात आगमन

Amit Kulkarni

ग्राहकांना तक्रारीसाठी ऑनलाईन पोर्टलची सोय

Amit Kulkarni

डिचोली तालुक्मयात आज गुरुवारी कोरोनाचे 44 रुग्ण 487 सक्रिय

Amit Kulkarni
error: Content is protected !!