Tarun Bharat

यंदा विकासदर 7.5 टक्के होण्याची अपेक्षा

पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन ः ब्रिक्स व्यापारी मंचाचा व्हर्च्युअल कार्यक्रम

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

भारताची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर असून विद्यमान आर्थिक वर्षात विकासाचा दर 7.5 टक्के असा समाधानकारक राहण्याची अपेक्षा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ब्रिक्स व्यापारी मंचाच्या कार्यक्रमात ते व्हर्च्युअल बोलत होते. भारतात डिजिटल अर्थव्यवस्थाही वेगाने विस्तारत आहे. ती 2025 पर्यंत एक लाख कोटी डॉलर्सची होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारतात गुंतवणूक करण्यास लाभदायक संधी आहेत. भारत 1.5 लाख कोटी डॉलर्सची गुंतवणूक सामावून घेऊ शकतो. भारत ही जगात सर्वात जास्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून कोरोना उद्रेकाच्या आव्हानात्मक काळातही आम्ही आमचे हे वैशिष्टय़ सिद्ध केले आहे. भारतात तंत्रज्ञानाचाही विकास झपाटय़ाने होत असून तंत्रज्ञान आधारित विकास करण्यावर भर दिला जात आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात गुणात्मक परिवर्तन होत असल्याचे प्रतिपादन मोदी यांनी केले.

आज शिखर परिषद होणार

ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांची ही आर्थिक परिषद असून ती ब्रिक्स या नावाने ओळखली जाते. या ब्रिक्सची शिखर परिषद गुरुवारपासून होत आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता ती यंदा प्रत्यक्ष न होता, ऑनलाईन होणार आहे. या पाच देशांची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या 20 टक्के आहे. आर्थिक सहकार्य हे या परिषदेचे उद्दिष्टय़ आहे.

व्यापारात वाढ

ब्रिक्स परिषदेतील देशांचा परस्पर व्यापार समाधानकारक गतीने वाढत आहे. पश्चिमात्य देशांनी रशिया आणि चीनवर कठोर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे त्या देशांच्या अर्थव्यवस्थांवर काहीसा परिणाम झाला आहे. तरीही ब्रिक्सची स्थिती संतोषजनक आहे, असा दावा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी केला. बडे देश जगाच्या अर्थव्यवस्थेला स्वतःच्या नियंत्रणात ठेवू पहात आहेत. त्यामुळे काही देशांवर अनाठायी निर्बंध घातले जातात, असा आरोपही त्यांनी केला.

आजही पंतप्रधान मोदींचे भाषण

ब्रिक्सची मुख्य शिखर परिषद गुरुवारी होत आहे. या प्रसंगीही पंतप्रधान मोदींचे भाषण होणार आहे. ते भारताच्या आर्थिक योजनांविषयी व जागतिक गुंतवणुकीविषयी आपली मते व्यक्त करणार आहेत. कोरोनाकाळात भारताने अर्थव्यवस्थेचे आव्हान कशाप्रकारे स्वीकारले, त्या संबंधी ते बोलण्याची शक्यता आहे. भारतात असणाऱया गुंतवणुकीच्या संधीसंबंधी ते पुन्हा आवाहन करतील.

Related Stories

जामिया गोळीबार प्रकरणी आरोपीची सुरक्षित कोठडीत रवानगी

Patil_p

शेख मुजीबुर्रहमान यांना गांधी शांतता पुरस्कार

Patil_p

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

Rohan_P

दुचाकीसाठी सरकारची नवी नियमावली

datta jadhav

राज्यसभेत महिला खासदारांना मारहाण; राहुल गांधींच्या नेतृत्वात विरोधकांचं संसदेबाहेर आंदोलन

Abhijeet Shinde

स्थानबद्धता केंद्रात 802 जणांचे वास्तव्य

tarunbharat
error: Content is protected !!