Tarun Bharat

शाही दसरा अन पर्यटनसंदर्भात पालकमंत्री शनिवारी घेणार आढावा

पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रशासनपातळीवर हालचाली सुरु

Advertisements

कोल्हापूर प्रतिनिधी

कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा सोहळ्याच्या अनुषंगाने कोल्हापूर जिह्याच्या पर्यटनवाढीला चालना देता येईल का? अशी भूमिका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर ते शनिवारी (दि.1) विविध घटकांशी संवाद साधून आढावा घेणार आहेत. त्यानुसार त्यांनी बुधवारी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे प्रशासनानेही हालचाली सुरु केल्या आहेत.

शाही दसरा सोहळ्याच्या अनुषंगाने कोल्हापूरच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी, तसेच सोहळ्यामध्ये राष्ट्रीय खेळाडू, नामवंत चित्रकार, शिल्पकार, कलाकार आदी घटकांना सहभागी करुन घेऊन या सोहळ्याची आणखी शोभा वाढविता येईल का ? या दृष्टीने शासनस्तरावर विचार सुरु आहे. तसेच पालकमंत्र्यांनीही यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यानुसार यासंदर्भातील महत्वाच्या सुचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. त्याप्रमाणे हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रशासनातील अधिकारी व पर्यटन समितीच्या काही पदाधिकाऱयांनी छत्रपती घराण्याशी संपर्क साधून प्राथमिक चर्चा केल्याचे समजते. तसेच रात्री उशिरा प्रशासकिय पातळीवर बैठक होऊनही त्यामध्ये याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.

Related Stories

कोल्हापूर जिल्हय़ात तातडीने लॉकडाऊन जाहीर करा : भाजप नेते धनंजय महाडिक

Archana Banage

कोल्हापूर : मोटर सायकलची टेम्पोला समोरासमोर धडक ; एक ठार

Archana Banage

शाहू विचार जागर यात्रेचे साताऱ्यात स्वागत; ज्येष्ठ विचारवंत आ.ह.साळुंखे यांनी दिल्या शुभेच्छा

Abhijeet Khandekar

भाजप आघाडीचे उमेदवार मताधिक्य घेणार – खा.सुजय विखे पाटील

Archana Banage

कोल्हापूर : कुपलेवाडीत डोंगराचे भूस्खलन झाल्याने पती-पत्नी ठार

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर ओसरण्याची गती होतेय संथ

Archana Banage
error: Content is protected !!