Influenza Virus : दिल्लीत एका नवीन व्हायरसने एन्ट्री केली आहे. श्वसनाशी संबंधित असणाऱ्या या आजाराचा ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना आणि पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना धोका आहे. इन्फ्लूएंझा व्हायरस असे त्याचे नाव आहे.
दिल्लीत हवा प्रदुषणाबद्दल आपण नेहमी ऐकतो. आता हवेतील प्रदुषणामुळे या व्हायरसची लागण होऊ शकते. हा व्हायरस थेट नाक, गळा यावर अटॅक करतो. सर्दीत ताप, नाकातून पाणी येणे, अंगदुखी, खोकला ही याची प्रमुख लक्षणं आहेत. या व्हायरसचं नाव H3N2 इन्फ्लूएंझा असं आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार एच३एन२ इन्फ्लूएंझा व्हायरस हा एक प्रकारचा फ्लू आहे. प्रामुख्याने या व्हायरसचे चार प्रकार पडतात. A, B, C आणि D.H3N2 हा इन्फ्लूएंझा व्हायरस टाईप A चा सब व्हेरिएंट आहे. हा विषाणू पक्षांपासून प्रत्येक श्वास घेणाऱ्या जीवाला बाधित करु शकतो.


previous post
next post