Tarun Bharat

उपोषणकर्त्या अंगणवाडी सेविकांची प्रकृती खालावली

Advertisements

पोर्णिमा गावकरला केले इस्पितळात दाखल

प्रतिनिधी/ पणजी

सेवेतून कमी केलेल्या सात अंगणवाडी सेविकांनी सेवेत परत घ्या या मागणीसाठी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणाला 10 दिवस उलटले. सरकार त्यांना न्याय देण्यास असमर्थ ठरत असून उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत आहे. सरकार आमच्या मरणाची वाट पाहत आहे की काय असा संतप्त सवाल उपोषणकर्त्या अंगणवाडी सेविकांनी केला आहे. शनिवारी पोर्णिमा गावकर हिचा रक्तदाब कमी होऊन प्रकृती खालावल्याने तिला 108 रुग्ण्वाहिकेतून इस्पितळात दाखल करण्यात आले. तर विद्या नाईक हिलाही अशक्तपणा जाणवत होता. 

येथील आझाद मैदानावर आपल्या रास्त मागणीसाठी संप करीत असलेल्या सात अंगणवाडी सेविकांना आज एक महिना झाला आहे. सुरुवातीला सहा दिवसांचे धरणे आंदोलन केले. नंतर 15 †िदवस साखळी उपोषण मात्र सरकारला जाग येत नसल्याने अखेर त्यांनी बेमुदत उपोषण करणे सुरु केले आहे. बेमुदत उपोषणाला आता 10 दिवस पूर्ण झाले तरी सरकार त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे दिसून येत आहे. 

 आमची कोणतीही चुक नसताना आम्हाला सेवेतून कमी करण्यात आले.  दिड हजार सेविकांनी आपल्या रास्त मागण्यासाठी संप केला होता. सरकारने त्या मागण्या मान्य करून त्यांना कामावर घेतले व आम्हा सात सेविकांना सेवेतून कमी केले. आमच्यावरच हा अन्याय कशासाठी असा प्रश्न उपोषणकर्त्या सेविकांनी  केला आहे. आम्हाला त्वरित सेवेत घ्या, अशी मागणी अंगणवाडी सेविका सरकारकडे करीत आहेत.

उपोषणकर्त्या अंगणवाडी सेविकांची प्रकृती गंभीर होत असून सरकार त्यांची मागणी मान्य करीत नाही. उलट उपोषण कर्त्यांना इस्पितळात दाखल करून त्यांना सहानीभूती दाखविण्याचे नाटक करीत आहे.      

 अंगणवाडी सेविकांचा प्रश्न गोवा फॉरवर्ड पक्षाने राज्यपालापर्यंत पोचविला असून राज्यपालांनी त्यात लक्ष घालणार असल्योच सांगितले आहे. 18 जून रोजी राज्यपाल आझाद मैदानावर येणार असल्याने उपोषणकर्त्यांना बळजबरीने उठविण्यात आले होते. असे राज्यापालांना सांगिले तेव्हा राज्यपाल म्हणाले की आपल्याला अंगणवाडी सेविकांच्या उपोषणाबाबत कोणतीही माहिती नाही.  आपण उपोषणकर्त्यांना आझाद मैदानावरून हलवा असे कुणालाही सांगितले नव्हते, असे  राज्यपाल म्हणाले. अगंणवाडी सेविकांच्या उपोषणाबाबत आणि त्यांच्या मागणीबाबत गोवा फॉरवर्डने राज्यपालांना निवेदन दिले आहे.

Related Stories

शिवसेना यापुढे गोव्यातील सर्व निवडणुका लढवणार

Patil_p

गोवा डेअरीच्या व्यवस्थापिका राधिका काळेंविरुद्ध आरोपपत्र

tarunbharat

मृत वाघ तब्बल चार, विषप्रयोगाचा संशय

Patil_p

प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवावे.

Amit Kulkarni

सुलभ शौचालयांमध्ये दिव्यांगांसाठी एका प्रसाधनगृहाची तरतूद

Patil_p

कोरोनासंबंधी गुरुवारपासून राज्यात सामाजिक सर्वेक्षण

Omkar B
error: Content is protected !!