Tarun Bharat

‘येळ्ळूर महाराष्ट्र मैदान’ची सुनावणी लांबणीवर

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांची उपस्थिती : पुढील सुनावणी 24 जानेवारी रोजी

प्रतिनिधी /बेळगाव

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच येळ्ळूरची ग्रामदेवता श्री चांगळेश्वरीची यात्रा होती. या यात्रेनिमित्त महाराष्ट्र मैदानावर कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या मैदानाला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी मतदारांना योग्य उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन केले होते. त्यामुळे त्यांच्यासह 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या खटल्याची बुधवारी सुनावणी होती. त्यामुळे भिडे गुरुजी न्यायालयात हजर झाले होते. या खटल्याची पुढील सुनावणी दि. 24 जानेवारी रोजी होणार आहे.

येळ्ळूर येथील महाराष्ट्र मैदानामध्ये मोठय़ा कुस्त्या भरविण्यात येतात. श्री चांगळेश्वरी देवीच्या यात्रोत्सवानिमित्त हे मैदान भरविले जाते. या मैदानाला अनेकजण भेट देत असतात. त्यावषी संभाजी भिडे गुरुजी यांनी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी या विधानसभेमध्ये जो उमेदवार प्रामाणिक आणि योग्य आहे, त्यालाच मतदान करा, असे आवाहन केले होते.

या आवाहनामुळे आचारसंहिता भंग झाली म्हणून संभाजी भिडे गुरुजी यांच्यासह  शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे, आयोजक प्रदीप देसाई, भोला पाखरे, दुद्दाप्पा बागेवाडी, डी. जी. पाटील, विलास नंदी, मधू पाटील यांच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे हे सर्वजण बुधवारी न्यायालयात हजर होते. या सर्वांच्यावतीने ऍड. शामसुंदर पत्तार काम पाहत आहेत.

Related Stories

मान्सूनच्या आगमनाने बळिराजाला दिलासा

Amit Kulkarni

सक्रिय रुग्ण संख्या दीड हजारांच्या उंबरठय़ावर

Patil_p

कोणत्याही यशाला शॉर्टकट नाही!

Amit Kulkarni

sतीस हजार लोकांना सु-मोटू च्या माध्यमातून मिळाली पेन्शन

Patil_p

हुदली येथे विषबाधेने माय-लेकाचा मृत्यू

Amit Kulkarni

सूत्रसंचालनात निरीक्षण वृत्ती महत्त्वाची

Amit Kulkarni