Tarun Bharat

बसवन कुडची येथील विद्युतवाहिन्यांची उंची वाढविली

नागरिकांच्या मागणीची हेस्कॉमने दखल घेतल्याने समाधान

प्रतिनिधी /बेळगाव

बसवन कुडची येथील गणेशभक्तांनी गावातील विद्युतवाहिन्यांची उंची वाढवावी, अशी मागणी हेस्कॉमकडे निवेदनाद्वारे केली होती. याची दखल घेत हेस्कॉमकडून विद्युतवाहिन्यांची उंची वाढविण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून उंची वाढविण्याचे काम सुरू होते. विद्युतवाहिन्यांचा धोका कमी झाल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान क्यक्त होत आहे.

बसवन कुडची गावामध्ये विद्युतवाहिन्यांची उंची कमी असल्यामुळे धोका निर्माण झाला होता. गणेशोत्सवाच्या काळात या विद्युतवाहिन्या मंडळांसाठी डोकेदुखीच्या ठरत होत्या. गणेशमूर्ती आगमन व विसर्जनावेळी कार्यकर्त्यांना तारेवरची कसरत करत मूर्तीची ने-आण करावी लागत होती. तसेच मोठी अवजड वाहने गावात आल्यानंतर धोका निर्माण होत होता. त्यामुळे विद्युतवाहिन्यांची उंची वाढवावी, अशी मागणी गावातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱयांनी हेस्कॉमकडे निवेदनाद्वारे केली होती.

आठवडाभरात विद्युतखांबांच्या  वीजवाहिन्यांची उंची वाढविली

नागरिकांच्या मागणीची दखल घेत अवघ्या आठवडाभरात जुन्या विद्युत खांबांना सपोर्ट जोडून वीजवाहिन्यांची उंची वाढविण्यात आली आहे. यामुळे गणेशभक्त तसेच नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. साहाय्यक कार्यकारी अभियंता विनोद करूर व सेक्शन ऑफिसर सिद्धू अंगडी यांच्या प्रयत्नाने काम पूर्ण करण्यात आले आहे.

Related Stories

आरटीओ मैदानानजीक ‘बर्निंग कार’

Amit Kulkarni

चौथ्या रेल्वेगेटमध्ये पुन्हा बिघाड

Amit Kulkarni

माजी नगरसेवक संघटनेतर्फे पालकमंत्री, रेल्वेमंत्र्यांचा सत्कार

Patil_p

तिसऱया दिवशीही परिवहन कर्मचाऱयांचे आंदोलन

Patil_p

अन् पुन्हा कलंडला रेल्वे गेट

Patil_p

विस्कळीत पाणीपुरवठय़ावरून अधिकारी धारेवर

Patil_p