Tarun Bharat

देखाव्यामधून साकारला छत्रपतींचा इतिहास

Advertisements

शहापूरची दौड ठरले आकर्षण : साप्ताहिक सुट्टीमुळे रविवारी नोकरदार, कामगार मोठय़ा संख्येने दौडमध्ये सहभागी : संख्या वाढतीच राहण्याचा अंदाज

प्रतिनिधी /बेळगाव

शहापूर, होसूर या मराठमोळय़ा भागात दुर्गामाता दौडचे जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत झाले. अनेक मंडळांनी तसेच शिवभक्तांनी जिवंत देखावे सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. नार्वेकर गल्ली येथे सादर करण्यात आलेले गोंधळ व शिवकालीन देखावे दुर्गामाता दौडचे वैशिष्टय़ ठरले. सजीव देखाव्यांमधून शिवरायांचा जाज्वल्य इतिहास मांडण्याचा प्रयत्न रविवारी दौडमधून झाला.

सातव्या दिवशीच्या दुर्गामाता दौडला शहापूर नाथ पै सर्कल येथील अंबाबाई मंदिरापासून सुरुवात झाली. शिवप्रति÷ान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई, जिल्हाप्रमुख किरण गावडे व शहापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. रावसाहेब देसाई यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. शहापूर परिसरात जल्लोषपूर्ण वातावरणात दुर्गामाता दौडचे स्वागत करण्यात आले. युवक मंडळांनी भव्यदिव्य कमानी उभारून शिवभक्तांचे स्वागत केले.

मराठमोळय़ा वातावरणात दुर्गादेवी, भवानी देवीची आरती गात दौड पुढे सरकत होती. रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे नोकरदारांचाही उत्साह दांडगा होता. प्रत्येक गल्लीने वेगवेगळय़ा पद्धतीने दौडचे स्वागत केले. फुलांची केलेली आरास लक्षवेधी ठरत होती. पांढरे सदरे, डोक्मयावर फेटा, पांढऱया टोप्या, कंबरेला बांधलेला शेला यामुळे एक पारंपरिक वेशभूषा दिसत होती. बसवेश्वर सर्कल गोवावेस येथे दौडची सांगता झाली. रावसाहेब देसाई व ऍड. शामसुंदर पत्तार यांच्या हस्ते आरती करून ध्वज उतरविण्यात आला. हजारोंच्या संख्येने दौडमध्ये तरुणाईचा सहभाग दिसला.

शिवभक्तांची संख्या वाढतीच

साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे रविवारी नोकरदार, कामगार मोठय़ा संख्येने दौडमध्ये सहभागी झाले होते. त्यातच रविवारपासून शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना दसऱयाची सुट्टी सुरू झाली आहे. त्यामुळे रविवारी हजारोंच्या संख्येने शिवभक्तांची उपस्थिती होती. पुढील तीनही दिवस ही संख्या वाढतीच राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मंगळवार दि. 4 रोजीचा दौडचा मार्ग

सोमनाथ मंदिर ताशिलदार गल्ली येथून दौडला प्रारंभ होणार आहे. फुलबाग गल्ली, पाटील गल्ली, शनिमंदिर रोड, मठ गल्ली, कलमठ रोड, अनंतशयन गल्ली, टिळक चौक, लोकमान्य रंगमंदिर रोड, कोनवाळ गल्ली, अनुपम हॉटेल रोड, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली, शिवाजी रोड, मुजावर गल्ली, कांगले गल्ली, स्टेशन रोड, पाटील गल्ली, फुलबाग गल्ली रोड, ताशिलदार गल्ली, पाटील मळा, भांदुर गल्ली, तानाजी गल्ली रेल्वेगेट, महाद्वार रोड, तानाजी गल्ली, समर्थनगर चौथा व पाचवा क्रॉस, महाद्वार रोड, कपिलेश्वर मंदिर, कपिलेश्वर ओव्हरब्रिज, शनि मंदिर येथे सांगता होणार आहे.

सुवर्ण सिंहासनासाठी कर्तव्य निधी

रविवारी झालेल्या दौडमध्ये अनेक शिवभक्तांनी रायगडावर पुनर्स्थापित होणाऱया 32 मण सुवर्ण सिंहासनासाठी कर्तव्य निधी दिला. हट्टीहोळ गल्ली येथील शांताराम कृष्णा गोवेकर यांनी 21 हजार 555 रुपये, कचेरी गल्ली येथील शिवसम्राट महिला मंडळाच्यावतीने 1 हजार 111 रुपये, हट्टीहोळ गल्ली येथील वैभव बाळकृष्ण घेवडे यांनी 5 हजार 1 रुपये, भोज गल्ली येथील कै. पार्वतीदेवी मारुती मजुकर यांच्या स्मरणार्थ शिवाजी मारुती मजुकर यांनी 5 हजार 1 रुपये, विष्णू सोनोलकर यांनी 2 हजार 100 रुपये, लक्ष्मी शट्टु पाटील यांनी 5 हजार 1 रुपये, मीना गोडसे यांनी 1 हजार रुपये, उमेश गोडसे यांनी 2 हजार 100 रुपये, मारुती बसवंत पाटील यांनी 11 हजार 1 रुपयांचा धनादेश शिवप्रतिष्ठानच्या पदाधिकाऱयांकडे सुपूर्द केला.

जोत्याजी केसरकर यांच्या वंशजांची राहणार उपस्थिती

जोत्याजी कृष्णाजी केसरकर हे कोल्हापुरातील पन्हाळा गावचे. पन्हाळागडाच्या पायथ्याशी असलेले हे छोटेसे गाव. छत्रपती संभाजी महाराजांच्या अगदी जवळचे सैनिक म्हणून त्यांचा इतिहासात उल्लेख सापडतो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती थोरले शाहू राजे या तिन्ही राजांच्या पदरी निष्ठा अर्पण करणारा जोत्याजी केसरकर हा एक मावळा. अनेक लढायांमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. शाहू राजांनी जोत्याजींच्या स्मरणार्थ सातारा शहरात केसरकर पेठ निर्माण केली, ती आजही पाहायला मिळते. त्यांचे वंशज विनायक सरदार केसरकर मंगळवार दि. 4 रोजी सोमनाथ मंदिर ताशिलदार गल्ली येथून सुरू होणाऱया दुर्गामाता दौडमध्ये सहभागी होणार आहेत.

Related Stories

रेल्वे थांबली… वाहतूक खोळंबली!

Amit Kulkarni

कर्नाटकच्या संभाव्य संघात सिद्धेश असलकरची निवड

Amit Kulkarni

लाळय़ा-खुरकत लसीकरण मोहीम लांबणीवर

Amit Kulkarni

माझा धर्म पशू बचाव संघटनेकडून गायीला जीवदान

Amit Kulkarni

मुटकोर्ट स्पर्धेत पुण्याचे सिम्बॉयसिस लॉ स्कूल विजयी

Omkar B

उरली ना जखमांची नवलाई, जिंकायचीय उद्याची लढाई!

Amit Kulkarni
error: Content is protected !!