Tarun Bharat

यजमान विंडीजची मालिका विजयाकडे वाटचाल

Advertisements

वृत्तसंस्था / ग्रॉस आयलेट (सेंट  लुसिया)

यजमान विंडीजने बांगलादेश विरूद्धची कसोटी मालिका जिंकण्याच्या देशेने वाटचाल केली आहे. येथे सुरू असलेल्या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत रविवारी खेळाच्या तिसऱया दिवसाअखेर बांगलादेशला डावाचा पराभव टाळण्यासाठी आणखी 42 धावांची जरूरी असून त्यांचे 4 गडी खेळावयाचे आहेत. दिवसअखेर बांगलादेशने दुसऱया डावात 6 बाद 132 धावा जमविल्या होत्या. विंडीजचा वेगवान गोलंदाज केमर रोशने कसोटी क्रिकेटमध्ये 250 बळींचा टप्पा गाठला.

विंडीजने या मालिकेतील पहिली कसोटी जिंकून बांगलादेशवर 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या दुसऱया कसोटीत बांगलादेशने पहिल्या डावात 234 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजने 5 बाद  340 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचा पहिला डाव 408 धावांत आटोपला. विंडीजचे शेवटचे पाच गडी 68 धावांची भर घालून तंबूत परतले. मेयर्सने 2 षटकार आणि 8 चौकारांसह 146, कर्णधार बेथवेटने 5 चौकारांसह 51, कँपबेलने 6 चौकारांसह 45, रिफेरने 3 चौकारांसह 22, ब्लॅकवूड 6 चौकारांसह 40, डिसिल्वाने 3 चौकारांसह 29 आणि रोशने 3 चौकारांसह नाबाद 18 धावा जमविल्या. मेयर्स आणि डिसिल्वा यांनी सहाव्या गडय़ासाठी 96 धावांची भागिदारी केली. मेयर्सचे हे कसोटीतील दुसरे शतक आहे. बांगलादेशतर्फे खलीद अहमदने 106 धावांत 5, मेहदी हसन मिराजने 91 धावांत 3 आणि एस. इस्लामने 76 धावांत 2 गडी बाद केले. विंडीजने बांगलादेशवर पहिल्या डावात 174 धावांची आघाडी मिळविली.

बांगलादेश संघाने दुसऱया डावात 36 षटकांत 6 बाद 132 धावा जमविल्या. विंडीजच्या वेगवान गोलंदाजीसमोर त्यांचा डाव कोलमडला. बांगलादेशच्या दुसऱया डावात तमीम इक्बालने 4, मेहमुदुल हसनने 3 चौकारांसह 13, नईमुल हुसेनने 8 चौकारांसह 42, अनामुल हकने 4, लिटॉन दासने 2 चौकारांसह 19, कर्णधार शकीब अल हसनने 1 चौकारांसह 16 धावा जमविल्या. नुरूल हसन 1 चौकारांसह 16 धावांवर खेळत आहे. विंडीजतर्फे रोशने 32 धावांत 3, जोसेफने 31 धावांत 2 आणि सिलेसने 15 धावांत 1 गडी बाद केला.

विंडीजच्या केमर रोशने कसोटी क्रिकेटमध्ये 252 बळी मिळविले आहेत. विंडीजतर्फे सर्वाधिक बळी मिळविणाऱया वेगवान गोलंदाजांच्या यादीत यापूर्वी बार्बाडोसच्या गार्नरने 259 बळी घेत पाचवे स्थान मिळविले होते. रॉच हा टप्पा गाठणारा बार्बाडोसचा दुसरा वेगवान गोलंदाज आहे. या कसोटीतील खेळाच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा संघ डावाचा पराभव टाळण्यासाठी प्रयत्न करेल.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश प. डाव-सर्वबाद 234, विंडीज प. डाव- 126.3 षटकांत सर्वबाद 408 (मेयर्स 146, ब्रेथवेट 51, कँपबेल 45, रिफेर 22, ब्लॅकवूड 40, डिसिल्वा 29, रॉश नाबाद 18, खलीद अहमद 5-106, मेहदी हसन मिराज 3-91, एस. इस्लाम 2-76), बांगलादेश दु. डाव- 36 षटकांत 6 बाद 132 (तमीम इक्बाल 4, मेहमुदुल हसन 13, नईमूल हुसेन 42, अनामूल हक 4, लिटॉन दास 19, शकीब अल हसन 16, नुरूल हसन खेळत आहे 16, रॉश 3-32, जोसेफ 2-31, सिलेस 1-15).

Related Stories

भारतीय महिला संघाचे मालिका विजयावर लक्ष

Patil_p

दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंडवर विजय

Patil_p

लिव्हरपूलला हरवून अर्सेनल विजेता

Patil_p

‘कागदी वाघां’ना नमवत न्यूझीलंड विश्वविजेते

Patil_p

भारतीय पुरूष हॉकी संघाचे आव्हान समाप्त

Patil_p

किवीज यष्टीरक्षक-फलंदाज वॅटलिंगची निवृत्तीची घोषणा

Patil_p
error: Content is protected !!