प्रतिनिधी /पेडणे
पेडणेत पडलेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजता सरमळे पणशीवाडा येथे बाबूराव धोंडू साळगावकर यांच्या राहत्या घराचा अर्धा भाग कोसळला. यात घराचे बरेच नुकसान झाले.
माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी भर पावसातच मदतकार्य केले. साळगावकर यांच्या घराचे सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
या मोहिमेत अग्निशामक दलाचे हवालदार जयराम शेटगावकर, चालक मथिएस मेंडोंसा, जवान मनोज साळगावकर, जवान अमोल परब, जवान अमित सावळ यांनी चांगली कामगिरी केली.