Tarun Bharat

हैदराबाद-पंजाब लढतीने आज ‘साखळी’ची सांगता

वृत्तसंस्था/ पॅरिस

पॅरिस सेंट जर्मन (पीएसजी) फुटबॉल संघातील अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू अँजेल डी मारियाने क्लब सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पीएसजी संघाच्या व्यवस्थापनाकडून ही माहिती देण्यात आली.

Advertisements

2015 उन्हाळी फुटबॉल हंगामात अर्जेंटिनाच्या अँजेल मारियाने पीएसजी फुटबॉल संघात प्रवेश केला होता. त्याने तब्बल सात वर्षे या क्लबचे प्रतिनिधीत्व करताना आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर पीएसजी क्लबला विविध 18 फुटबॉल स्पर्धा जिंकून दिल्या. पीएसजी संघातील अँजेल मारिया हा प्रमुख स्ट्रायकर म्हणून ओळखला गेला. त्याने विविध स्पर्धामध्ये 15 गोल नोंदविले आहेत. अर्जेंटिनाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अँजेल मारियाने आपल्या वैयक्तिक फुटबॉल कारकीर्दीत  294 सामन्यात 91 गोल नोंदविले आहेत.

अँजेल मारियाने पीएसजी संघाला 2016, 2018, 2019, 2020, 2022 साली फुटबॉल लीग-वन स्पर्धेतील अजिंक्यपदे मिळवून दिली. तसेच त्याने 2016, 2017, 2018, 2020 साली पीएसजी संघाला चारवेळा कूप डी ला लीगा स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवून दिले आहे.

Related Stories

बायर्नची सलग आठव्या जेतेपदाकडे वाटचाल

Patil_p

कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका; फोर्टिस रुग्णालयात दाखल

datta jadhav

लिव्हरपूलची साऊदम्प्टनवर मात

Patil_p

स्विस बुद्धिबळ स्पर्धेत शशीकिरण संयुक्त आघाडीवर

Patil_p

सचिन तेंडुलकरचे 1 कोटी रुपयांचे सहाय्य

Amit Kulkarni

न्यूझीलंडचा नील वॅग्नर दुसऱया कसोटीतून बाहेर

Patil_p
error: Content is protected !!