Tarun Bharat

खुनासाठी प्रेरणा ‘दृष्यम्’ सिनेमाची

Advertisements

माय-लेकींनी तर पाहिलाच मित्रालाही पाठविली लिंक

प्रतिनिधी /बेळगाव

कॅम्प येथील सुधीर कांबळे (वय 57) या रिअलइस्टेट व्यावसायिकाच्या खून प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती सामोरी आली आहे. सुधीरच्या खुनासाठी त्याच्या पत्नी व मुलीने सिनेमाची प्रेरणा घेतल्याचे उघडकीस आले आहे.

कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी व सहकाऱयांनी सुधीरची पत्नी रोहिणी कांबळे (वय 50), मुलगी स्नेहा (वय 28, दोघेही रा. मद्रास स्ट्रीट कॅम्प), स्नेहाचा मित्र अक्षय महादेव विठकर (वय 34, रा. पिंपरी, चिंचवड, पुणे) या तिघांना अटक केली. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

16 सप्टेंबरच्या रात्री या व्यावसायिकाचा खून झाला. सुरुवातीला घटनास्थळी भेट देणाऱया पोलिसांना सुधीरच्या पत्नी व मुलीने कसलीच माहिती दिली नाही. याउलट तपास अधिकाऱयांची दिशाभूल होईल, असेच त्यांचे वर्तन होते. वरि÷ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी, पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पुजारी, बी. आर. डुग, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सुमन पवार, किरण होनकट्टी, पोलीस हवालदार महेश पाटील, श्रीधर तळवार, संतोष बरगी आदींचा समावेश असलेल्या पथकाने प्रकरणाचा छडा लावला.

उपलब्ध माहितीनुसार सुधीरचा काटा काढण्यासाठी या माय-लेकींनी ‘दृष्यम’ हा सिनेमा अनेकवेळा पाहिला आहे. स्नेहाने अक्षयलाही त्याची लिंक पाठवून सिनेमा बघण्यास सांगितला होता. कारण दक्षिणेतील वेगवेगळय़ा भाषेत आलेल्या या चित्रपटात खुनाचे गूढ गूढच राहील, असे कथानक आहे. त्याची प्रेरणा घेऊन या त्रिकुटाने खुनाचा कट रचल्याची माहिती मिळाली आहे.

सुधीर व पत्नी रोहिणी यांच्यात कौटुंबिक वाद होताच. पुण्यात नोकरी करणाऱया स्नेहा व अक्षय यांचे सुत जुळले होते. या प्रेमाला सुधीरचा विरोध होता. ‘चांगले स्थळ बघून तुझे लग्न करू’, असे त्यांनी मुलीला समजावून सांगितले होते. कोरोना काळात दुबईहून बेळगावला आलेले सुधीर पुन्हा दुबईला जाणार होते. मात्र काही कारणांमुळे त्यांचा दौराही रद्द झाला. त्यांच्यामुळे आपल्या अडचणी वाढणार म्हणून माय-लेकींनी अक्षयच्या मदतीने त्यांचा काटा काढल्याचे उघडकीस आले आहे.

Related Stories

दिवाणी न्यायालयातही आम्हाला न्याय मिळणारच

Patil_p

मटका, गावठी दारू अड्डय़ांवर छापे

Patil_p

रंजन मरवे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

मंगाई देवस्थान कमिटीचे भाविकांना आवाहन

Patil_p

बेळगाव-खानापूर एक्स्प्रेस बस तिकीट दरात वाढ

Amit Kulkarni

जाधवनगर येथे बिबट्याची दहशत

Nilkanth Sonar
error: Content is protected !!