Tarun Bharat

आरोप होताच तपास अधिकारी बदलले

Advertisements

गौंडवाड खूनप्रकरणाची चौकशी मार्केट एसीपींकडे : खूनप्रकरणी आणखी एका युवकाला अटक

प्रतिनिधी / बेळगाव

गौंडवाड (ता. बेळगाव) येथे गेल्या शनिवारी रात्री झालेला युवकाचा खून व त्यानंतर उमटलेले पडसाद या संपूर्ण प्रकरणात काकती पोलिसांवर स्थानिक नागरिक व यमकनमर्डीच्या आमदारांनी आरोप करताच पोलीस आयुक्तांनी तपास अधिकारी बदलले आहेत. दरम्यान खूनप्रकरणी गुरुवारी आणखी एका युवकाला अटक केली आहे.

महांतेश जायाप्पा निलजकर (वय 23, रा. होळी गल्ली, गौंडवाड) असे पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. आतापर्यंत याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या 11 वर पोहोचली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

बुधवारी यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी गौंडवाडला भेट देऊन खून झालेल्या सतीश पाटील (वय 37) या युवकाच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. आमदारांनी गावकऱयांचीही बैठक घेऊन त्यांना धीर दिला. या बैठकीत गावकऱयांनी काकती पोलिसांवर आरोप केले होते. पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे आमदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते.

खून-जाळपोळप्रकरणी धरपकड सुरूच

बैठकीनंतर आमदार सतीश जारकीहोळी यांनीही काकती पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे गौंडवाड येथील घटना घडल्याचा आरोप केला होता. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काकती पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास मार्केटच्या एसीपींकडे सोपविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. खून व जाळपोळ प्रकरणी अद्याप धरपकड सुरूच आहे.

काकती पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱयात

बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर गावकऱयांनी मोर्चा काढला होता. मोर्चाला परवानगी मागण्यासाठी पोलीस स्थानकात गेलेल्या महिलांनाच काकती पोलिसांनी पोलीस स्थानकात कोंडून त्यांच्या हातातील मोबाईल काढून घेतल्याचा प्रकार घडला होता. याकडेही महिलांनी स्थानिक आमदारांचे लक्ष वेधले होते. पोलीस गुन्हेगारांना सोडून निरापराधांची धरपकड करीत असल्याचा आरोपही करण्यात आला होता. काकती पोलिसांची भूमिकाच संशयाच्या भोवऱयात अडकली असून खून व जाळपोळीची घटना घडली त्यावेळी काकती पोलीस वेळेत पोहोचले नाहीत.

Related Stories

रामनगर वड्डर छावणीतील घरांची पुनर्बांधणी करा

Amit Kulkarni

बोगस रेशनकार्ड सर्व्हेला वेग

Patil_p

संस्कृती, संस्कार, संगीताची जपणूक करणाऱया सरस्वती देवीच!

Amit Kulkarni

बनावट आरटीपीसीआर रॅकेटचा पर्दाफाश

Amit Kulkarni

कॅम्पमधील वाल्मिकी मंदिर हस्तांतर करण्यासाठी नोटीस

Patil_p

12 एकर जमिनीसाठी घडले दोडवाडचे तिहेरी हत्याकांड

Patil_p
error: Content is protected !!