Tarun Bharat

विदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढली

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मागच्या  महिन्यात शुद्ध खरेदीदार राहिल्यावर विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय इक्विटीप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवला असून ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात 14 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे दिसून आले आहे.

जुलैमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी 5 हजार कोटीची गुंतवणूक केली होते. विदेशी गुंतवणूकदारांनी मागच्या ऑक्टोबर (2021) पासून जून 2022 पर्यंत विक्रीवर भर दिला होता. 2.41 लाख कोटी रुपयांची इक्विटी समभागांची विक्री करण्यात आली होती.

रुपयांची घसरण आता थांबली असून आगामी काळात शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीचा ओघ वाढण्याची चिन्हे आहेत. रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत मजबूत होत असून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीही कमी होत आहेत. या स्थितीचा विचार करता आगामी काळातही बाजारात गुंतवणूक वाढणार हे नक्की, असे मत तज्ञांनी वर्तवले आहे.

Related Stories

महानगरात सायकल मागणी 50 टक्क्मयांनी वाढली

Patil_p

म्युच्युअल फंडातून 10 हजार कोटी काढले

Patil_p

एअरटेल डाटा केंद्रामधील 25 टक्के हिस्सा अमेरिकन ग्रुपला विकणार

Patil_p

दुसऱया सहामाहीत जीडीपी सुधारण्याचे संकेत

Amit Kulkarni

टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांना 20 कोटीपेक्षा अधिकची वेतनवाढ

Patil_p

विदेशी चलन साठा विक्रमी स्तरावर

Patil_p
error: Content is protected !!