ईयूच्या आदेशानंतर ऍपलचा निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऍपल आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी देत आहे. आता कंपनी
प्रोडक्ट्समध्ये युएसबी टाईप-सी चार्जिंग पोर्ट देण्यासाठी तयार आहे. यासंदर्भातली माहिती ऍपलचे मार्केटिंग प्रमुख ग्रेग जोस्विकने यांनी दिली आहे. युरोपियन यूनियनचे युनिव्हर्सल चार्ज नियम लागू केल्यानंतर ऍपल आपल्या डिव्हाइसेसमध्ये सिंगलिंग पोर्ट तयार करत आहेत.
साधारणपणे यूरोपियन यूनियनच्या पार्लमेंटकडून तीन आठवडे अगोदरच यूनिव्हर्सल चार्जर नियम लागू केले आहेत. इयूने या नियमांनुसार 2024 पर्यंत सर्व कंपन्यांचे मोबाइल फोन, टॅब्लेट आणि डेस्कटॉप सर्व डिव्हाइसेससाठी सिंगलिंग पोर्ट एकच करण्याचे निर्देश दिले. याचा अर्थ सर्व कंपन्यांना मोबाईल फोनमध्ये देखील टाइप-सी चार्जिंग पोर्ट द्यावे लागणार आहे.
15 सीरीजचा यूएसबी-सी पोर्ट लॉन्च होईल
ग्रेग जोस्विक म्हणाले की आयफोन-15 सीरीज 2023 पर्यंत लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने पहिल्यांदा मॅक, अनेक आयपॅड मॉडेल आणि यूएसबी टाइप-सी पोर्टसह ऍक्सेसरीजची शिपिंग सुरू केली आहे.
भारतावर काय होणार परिणाम
युरोपियन युनियनमध्ये एकूण 27 देश आहेत. युरोपियन यूनियनचा युनिव्हर्सल चार्जरचा नियम भारतात लागू होणार नाही. तथापि, जेव्हा ऍपल सारखी कंपनी युरोपियन यूनियन देशांसाठी कोणतेही एक चार्जर तयार केले जाते, ते त्या संपूर्ण देशासाठी देखील बनवण्याची क्षमता असते. यामधून होणारा खर्चही कमी होऊ शकतो.