स्विगी, गो फर्स्ट, ओयो आणि बायजूस आयपीओ आणण्याच्या तयारीत
नवी दिल्ली
नवीन वर्षात म्हणजेच 2023 मध्ये जर अधिकचा पैसा कमवायचा असेल तर त्याकरीता गुंतवणूकदारांना मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचे संकेत दिसत आहेत. कारण यामध्ये अनेक मोठय़ा कंपन्या नवीन वर्षात त्यांचा आयपीओ (येणारे वर्ष 2023) घेऊन येणार आहेत. या आयपीओंमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा हा गुंतवणूकदारांना होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2022 मध्ये अनेक कंपन्या त्यांचे आयपीओ घेऊन आल्या आहेत. यापैकी अनेक आयपीओमध्ये गुंतवणूकदारांनी प्रचंड नफा कमावला. मात्र, अनेक आयपीओंनी गुंतवणूकदारांची घोर निराशाही केली. 2022 मध्ये आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकत नसला तरीही निराश होऊ नका आता नव्या वर्षात नव्या आयपीओंमध्ये गुंतवणूक करण्याची संधी चालून येणार आहे.
आयपीओ सादर करणाऱया मुख्य कंपन्या
wस्विगी
होनासा कन्झुमर लिमिटेड यांच्या मालकीचा प्रसिद्ध ब्रँड मामाअर्थ यांचा आयपीओ नव्या वर्षी येणार आहे. 2016 मध्ये बेबी केअर ब्रँड म्हणून कंपनीची सुरुवात झाली. कंपनी आपली उत्पादने ऑनलाइन आणि ऑफलाइनवर विक्री करते. मामाअर्थ हा आता भारत, दक्षिण पूर्व आशिया आणि मध्य पूर्वमध्ये कार्यरत असलेला सौंदर्य आणि स्किनकेअरसंबंधीत उत्पादनांचा प्रसिद्ध ब्रँड आहे. कंपनीने गेल्या 8 वर्षात अनेक ब्रँड्स विकत घेतले आहेत. गेल्या तीन वर्षांत कंपनीचा महसूल 105 टक्केसह वाढला आहे. कंपनी 2023 मध्ये आपला आयपीओ सादर करण्याच्या तयारीत आहे.
स्विगी यांच्या व्यवसायाची 2014 मध्ये बंगळुरू येथून सुरुवात झाली आहे. सध्या ते भारतातील 500 हून अधिक शहरांमध्ये कार्यरत आहेत. स्विगी हे ऑनलाइन फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहे. सध्या कंपनीची 1 लाख 50 हजारांहून अधिक रेस्टॉरंटशी भागीदारी आहे. गेल्या तीन वर्षांत, कंपनीचा महसूल 25.4 टक्क्यांनी वाढला असून स्विगी 2023 मध्ये आपला आयपीओ बाजारात आणण्याची योजना आखत आहे.
wगो फर्स्ट
देशांतर्गत विमान कंपनी गो फर्स्ट देखील 2023 मध्ये आपला आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हा आयपीओ कंपनीसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून 3600 कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. कंपनीची स्थापना 2005 मध्ये झाली आहे.
wओयो
ओयोला ओरेव्हल स्टेय लिमिटेड असेही म्हणतात. ओयो 2023 च्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये आपला आयपीओ सादर करण्याची तयारी करत आहे. कंपनीकडे सध्या भारतात आणि परदेशात 157,000 हून अधिक हॉटेल
स्टोअरप्रंट्सचा सर्वात मोठा हिस्सा आहे. कंपनी 35 देशांमध्ये आपल्या भागीदारांना आणि ग्राहकांना 40 हून अधिक उत्पादने आणि सेवा ऑफर करते.
wबायजूस
बायजूस देशातील सर्वात मजबूत स्टार्टअप आणि ऑनलाइन शिक्षण क्षेत्रातील कंपनी आहे. 2023 मध्ये आपला आयपीओ बाजारात आणण्याची तयारी करत आहे. सध्या कंपनीकडे 50 दशलक्षाहून अधिक नोंदणीकृत विद्यार्थी आहेत. बायजूस गेल्या पाच वर्षांत झपाटय़ाने वाढली आहे. गेल्या तीन वर्षांत कंपनीचा चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर 21.2 टक्के आहे. बरेच लोक बायजूसच्या आयपीओच्या प्रतीक्षेत आहेत. सदरचा आयपीओ हा 2023 चा सर्वात मोठय़ा आयपीओपैकी एक राहणार असल्याचे बोलले जात आहे.