Tarun Bharat

चाकरमान्यांची सफर पोलीस बंदोबस्तात

माणगाव येथील दुर्घटनेनंतर पोलीस बंदोबस्तातही वाढः रेटारेटीचा प्रवास सुरूच, आजपासून पुन्हा उसळणार गर्दी

प्रतिनिधी/ खेड

परतीच्या प्रवासाला निघालेल्या चाकरमान्यांमुळे रेल्वेगाडय़ांना उसळणारी गर्दी कायम आहे. राज्य राखीव दलाचे शस्त्रधारी पोलीस व स्थानिक पोलीस ऑन डय़ुटी 24 तास सेवा बजावत आहेत. माणगाव रेल्वेस्थानकात गणपती स्पेशलवर झालेल्या दगडफेकीनंतर सर्वच रेल्वेस्थानकात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्तातच चाकरमान्यांची सफर सुरू आहे. स्थानकात दाखल होणाऱया सर्वच रेल्वेगाडय़ांच्या डब्यांचे दरवाजे उघडे राहतील, याचीही खबरदारी घतली जात आहे.

चाकरमान्यांसाठी गणपती स्पेशलच्या तुलनेत जलद एक्स्प्रेस गणपती स्पेशल गाडय़ांच्या फेऱया कमी झाल्यामुळे कोकण मार्गावर तुफानी गर्दीमुळे रेटारेटीचा प्रवास सुरूच आहे. अनंत चतुर्दशीनंतरही या गर्दीचा ओघ पुन्हा वाढणार आहे. गणपती स्पेशल गाडय़ांमध्ये जागा न मिळालेल्या संतप्त प्रवाशांनी गोंधळ घातला होता. यासाठी सर्वच रेल्वेस्थानकात शस्त्रधारी पोलिसासह स्थानिक पोलिसांची कुमक तैनात आहे. परतीच्या प्रवासातही रेल्वेगाडय़ा विक्रमी गर्दीने धावत असल्याने ही यंत्रणा 24 तास जागता पहारा देत आहे. 

 स्थानकात रेल्वेगाडी दाखल होताच प्रवाशांच्या दिमतीला पोलीस यंत्रणा धावत असून चोख पोलीस बंदोबस्तातच चाकरमान्यांची सफर सुरू आहे. पोलिसांच्या या नियोजनामुळे स्थानकात तिष्ठत बसणाऱया चाकरमान्यांना रेल्वेगाडय़ांमध्ये प्रवेश मिळत आहे. अनंत चतुर्दशीनंतर रेल्वेगाडय़ांना आणखी गर्दी उसळण्याची शक्यता असल्याने राज्य राखीव दलासह स्थानिक पोलिसांना आणखी काही काळ जागता पहारा द्यावा लागणार आहे. 

  एलटीटी-ठोकूर स्पेशल 11 सप्टेंबरपर्यंत धावणार

लोकमान्य टिळक टर्मिनस-ठोकूर गणपती स्पेशल 11 सप्टेंबरपर्यंत धावणार आहे. एलटीटीहून रात्री 10.15 वा. सुटून दुसऱया दिवशी सकाळी 4.30 वा. ठोकूर येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात ठोकूर येथून सायंकाळी 7.30 वा. सुटून दुसऱया दिवशी दुपारी 1.25 वा. एलटीटीला पोहचेल.

Related Stories

रत्नागिरीहून चुनवरेत आलेला युवक ‘क्वारंटाईन’

NIKHIL_N

खेड पंचायत समितीपाठोपाठ नगर परिषदेतही कोरोनाची एन्ट्री

Patil_p

दीपक केसरकरांना आवर घाला- तेलींची वरिष्ठांकडे मागणी

Anuja Kudatarkar

सिंधुदुर्गचा ‘ग्रीन झोन’मध्ये समावेश करा – नीतेश राणे

NIKHIL_N

मुंबई-गोवा महामार्गावर आराम बस जाळून खाक

Archana Banage

राज्यपाल कोश्यारी सिंधुदुर्गात दाखल

Anuja Kudatarkar