Tarun Bharat

दुसऱया सत्राचा प्रवास चढउताराच्या दबावात

औषध, सार्वजनिक बँका व धातू क्षेत्र नुकसानीत ः सेन्सेक्स तेजीत

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय भांडवली बाजारामध्ये चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारच्या सत्रात चढउताराचा प्रवास राहिला होता. यामध्ये बीएसई सेन्सेक्स तेजीमध्ये तर निफ्टी घसरणीसोबत बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवसभरातील कामगिरीमध्ये औषध, सार्वजनिक बँका, धातू व रियल्टी या क्षेत्रातील निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले आहेत.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 37.08 अंकांनी वधारुन निर्देशांक 60,978.75 वर बंद झाला आहे. तर दुसऱया बाजूला एनएसई  निफ्टी दिवसअखेर 0.25 टक्क्यांनी प्रभावीत होत निर्देशांक 18,118.30 वर बंद झाला आहे.

मंगळवारच्या सत्रात प्रमुख क्षेत्रांमध्ये वाहन क्षेत्राचा निर्देशांक वधारला आहे. यासोबतच औषध, सार्वजनिक क्षेत्रातील बँक व रियल्टी यांचा निर्देशांक मात्र घसरणीसह बंद झाले आहेत. मिडकॅप व स्मॉलकॅप यांचा निर्देशांक 0.3 ते 0.4 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत.

मुख्य कंपन्यांमध्ये मारुती सुझुकीचे समभाग 3.27 टक्क्यांनी वधारले आहेत. यासह एचसीएल टेक व एचडीएफसी बँक यांचे समभागही तेजीत राहिले होते. या व्यतिरिक्त एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, टीसीएस, टेक महिंद्रा, आयटीसी, भारती एअरटेल, इन्फोसिस टायटन व बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत.

अन्य कंपन्यांमध्ये ऍक्सिस बँकेचे समभाग सर्वाधिक 2.50 टक्क्यांनी घसरुन बंद झाले आहेत. यामध्ये पॉवरग्रिड, टाटा स्टील, कोटक महिंद्रा बँक, लार्सन ऍण्ड टुब्रो, स्टेट बँक, सनफार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी व अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग प्रभावीत राहिले आहेत.

रुपयाची घसरण

मंगळवारच्या दिवशी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया हा 33 पैशांनी घसरुन 81.72 वर स्थिरावत बंद झाला आहे. या अगोदरच्या सत्रात रुपया 81.39 वर बंद झाला होता.

Related Stories

‘क्रिप्टोकरंसी’च्या किंमतीमध्ये मोठी घसरण

Patil_p

आयपॉडचे उत्पादन कायमचे थांबणार

Patil_p

अदानी समूह इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात उतरण्याचे संकेत

Patil_p

विदेशामध्ये दागिन्यांची मागणी वाढली

Patil_p

विप्रो-एचएफसीएलची 5-जी उत्पादनासाठी हातमिळवणी

Patil_p

शापुरजी पालनजी ग्रुपला मिळाली ऑस्टेलियातून ऑर्डर

Patil_p