Tarun Bharat

खरीप क्षेत्रात 36 हजार हेक्टरने होणार वाढ

Advertisements

कृषी खात्याची माहिती : हंगाम तोंडावर, कृषी खाते सज्ज

प्रतिनिधी /बेळगाव

यंदा जिल्हय़ात समाधानकारक पाऊस झाल्याने पेरणी क्षेत्रात वाढ होणार आहे. या पार्श्वभूमीवर कृषी खात्याने बी-बियाणे, खते, कीटकनाशके आणि शेतीसंबंधी उपकरणे सज्ज केली आहेत. गतवषी 7.16 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. यंदा त्यात 36 हजार हेक्टरनी वाढ होणार आहे. त्यामुळे यंदा 7.52 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी अपेक्षित असल्याची माहिती कृषी खात्याने दिली.

गतवषीपेक्षा यंदा पेरणी क्षेत्रात वाढ होणार आहे. यंदा भात, मका, सोयाबीन, कडधान्य पेरणीत वाढ होणार असली तरी ऊस आणि मुगाच्या क्षेत्रात घट झाली आहे. मका 18 हजार हेक्टर, कापूस 8 हजार हेक्टर तर विविध कडधान्ये 10 हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली आहेत. गतवषी 2.88 लाख हेक्टर उसाचे क्षेत्र होते. यंदा त्यात घट झाली असून ते 2.85 लाख हेक्टर क्षेत्रावर आले आहे. त्याबरोबर मुगाचे 10 हजार हेक्टर क्षेत्र कमी झाले आहे.

खरीप हंगाम तोंडावर आल्याने कृषी खात्याने 59.500 मेट्रिक टन बी-बियाणे रयत संपर्क केंद्र आणि पीकेपीएस संघांकडे दिली आहेत. तर 27.400 मे. टन बी-बियाणांचा साठा करण्यात आला आहे. त्याबरोबर 2 लाख 65 हजार मेट्रिक टन खताचे वितरण झाले आहे. तर 65 हजार मेट्रिक टन खत साठा करून ठेवला आहे. जिल्हय़ात 121 केंदे आहेत. त्यामध्ये 35 रयत संपर्क केंद्रे, 133 पीकेपीएस संघ आणि इतर 21 केंदे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये शेतकऱयांना सवलतीच्या दरात बी-बियाणे, खते पुरविली जाणार आहेत. गतवषीपेक्षा यंदा मे महिन्यात अधिक पाऊस झाला आहे. दरवर्षी मेमध्ये 33 मि. मी. पाऊस होतो. त्या तुलनेत यंदा 129 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामेदेखील सुरळीत सुरू झाली आहेत. यंदा वेळेत पेरणीला सुरुवात होणार आहे. याकरिता कृषी खात्याने सर्व तयारी केली आहे.

खतांचा आवश्यक पुरवठा करणार

यंदा बी-बियाणे, खते, वेळेत पुरविली जातील, त्याबरोबर खते आणि बी-बियाणे कमी पडणार नाहीत याची काळजी घेतली जाणार आहे. 25 मेपासून रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणीला प्रारंभ होईल.तत्पूर्वी सर्व रयत संपर्क केंद्रे आणि कृषी पत्तीन संघांमध्ये आवश्यक बी-बियाणे आणि खते पुरविली जाणार आहेत.

 – शिवनगौडा पाटील (उपनिर्देशक, कृषी खाते)

कृषी खात्याने सज्ज केलेला खताचा साठा

खताचा प्रकारमेट्रिक टन
यूरिया1,27,548
डीएपी28,414
पोटॅश29,409
कॉम्प्लेक्स68,867
सुपर फॉस्फेट11,174
एकूण2,65,412

तालुकानिहाय पेरणीचे उद्दिष्ट

तालुकेपेरणीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
अथणी93,850
बैलहोंगल83,935
बेळगाव52,065
चिकोडी94,090
गोकाक1,11,094
हुक्केरी67,190
खानापूर51,043
रायबाग64,415
रामदुर्ग58,420
सौंदत्ती76,802
एकूण7,52,904

Related Stories

‘आलमट्टी’जलाशयात गतवषीपेक्षा दुप्पट पाणीसाठा

Amit Kulkarni

दिल्ली सरकारकडे शेतकऱयांच्या समस्या मांडू

Patil_p

थोरल्याचा मृत्यू..धाकटय़ानेही सोडला प्राण

Patil_p

विकासकामात अडथळे आणणाऱया तथाकथित पत्रकारांवर कारवाई करा

Amit Kulkarni

मनपा आयुक्तांच्या सूचनेने शेतकऱयांतून नाराजी

Amit Kulkarni

नाहक फिरणाऱयांची आता दंडऐवजी कोरोना टेस्ट ?

Amit Kulkarni
error: Content is protected !!