प्रतिनिधी/तासगाव
तासगावातील डॉ. अंजली पाटील यांच्या हॉस्पिटल मधून रविवारी सकाळी एका महिलेने अपहरण केलेले एक दिवसाचे बाळ भवानीनगर -पलूस येथे सापडलं हे बाळ सुखरूप असल्याची माहिती तासगाव पोलिसांनी दिलीय. तासगाव पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे.
तासगावातील सिद्धेश्वर चौक नजीक असलेल्या डॉ.अंजली पाटील यांच्या सरस्वती- आनंद या हॉस्पिटलमधून एका महिलेने नर्स असल्याचे भासवून वार्ड मध्ये जाऊन तेथील एक दिवसाचे बाळ घेऊन पलायन केले होते. या घटनेने शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली होती. तर या घटनेचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने तातडीने तपास सुरू केला व भवानीनगर- पलूस येथे हे बाळ या पोलीस पथकास मिळून आले. तर हे बाळ सुखरूप असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल डीबी पथकाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.तर सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला आहे.
हे ही वाचा : धक्कादायक ! नर्स असल्याचे भासवून एका दिवसाच्या चिमुरड्याचे केले अपहरण; तासगावातील घटना