Tarun Bharat

कुस्तीगीर परिषदेचा वाद अखेर मिटला; बाळासाहेब लांडगेंचा राजीनामा

पुणे / प्रतिनिधी :

बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेला कुस्तीगीर परिषदेचा वाद अखेर मिटला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्या मध्यस्थीने तोडगा काढण्यात आला असून, बाळासाहेब लांडगे (Balasaheb Landge) यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या सचिवपदाचा राजीनामा दिला आहे, तर रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्या अध्यक्षतेखालील नवीन कार्यकारिणी आता काम पाहणार असून, शरद पवार हे मुख्य आश्रयदाते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद नेमकी कोणाची यावरून वाद सुरू होता. या वादावर सर्वमताने तोडगा काढण्यात आला आहे. शरद पवार यांनी या परिषदेच्या अध्यक्षपदाचा, तर बाळासाहेब लांडगे यांनी सचिव पदाचा राजीनामा भारतीय कुस्ती महासंघाकडे दिला आहे. भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे काम नवीन कार्यकारिणी पाहणार आहेत.

अधिक वाचा : ‘राज ठाकरे चूहा है’ म्हणणारे बृजभूषण सिंह पुण्यात येणार, मनसे विरोध करणार?

शरद पवार यांना मुख्य आश्रयदाते म्हणून कुस्तीगीर परिषदेमध्ये मान देण्यात आला आहे, बाळासाहेब लांडगे यांना आश्रयदाते म्हणून परिषदेत सामावून घेण्यात आले आहे. यामुळे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ आजोयक असलेल्या 11 ते 15 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात येणार असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला आहे.

Related Stories

जलशक्ती अभियानाच्या यशस्वीतेसाठी विशेष ग्रामसभा घ्या- जिल्हाधिकारी

Abhijeet Khandekar

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सेट परीक्षा 27 डिसेंबरला

Tousif Mujawar

त्रावणकोर राजकुमारींची न्यू पॅलेसला सदिच्छा भेट

Abhijeet Khandekar

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 92 हजार 990 वर

Tousif Mujawar

वणवा लावल्या प्रकरणी मुख्याध्यापक व शिक्षिकेला प्रत्येकी पाच हजार रुपये दंड

Patil_p

चीनने आक्रमकपणा दाखविल्यास जशास तसे उत्तर द्या…

datta jadhav