दिनांक 21-08-2022
मेष
आठवडय़ाच्या सुरुवातीला अडचणींवर मात कराल. घरात एखाद्या मंगलकार्याची सुरुवात होईल. मित्र परिवाराकडून सहकार्य मिळण्याची शक्मयता आहे. काही जुन्या आठवणींमध्ये रमून जाल. या आठवडय़ात पूर्वी दिलेले वचन न पाळल्यामुळे छोटासा प्रॉब्लेम होऊ शकतो. पैशांच्या बाबतीत कोणालाही कुठलीही कमिटमेंट देऊ नका. प्रेमा तुझा रंग कसा असा प्रश्न पडेल.
पांढरी मिठाई दान करावी.
वृषभ
योजलेल्या कामांमध्ये काही अडथळे येण्याची शक्मयता आहे त्यामुळे निराश न होता प्रयत्न करणे सोडू नका. कौटुंबिक वातावरणामध्ये सुधारणा होईल. पैशांची आवक मनासारखी असेल पण त्याकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. एखादी वस्तू वेळेवर न सापडल्यामुळे चिडचिड होऊ शकते. एखाद्या ज्ये÷ व्यक्तीचा सल्ला कामाच्या ठिकाणी उपयोगी येईल. प्रेमींनी संयम बाळगावा.
कच्च्या जमिनीवरती तेलाचे चार थेंब सोडावेत.
मिथुन
आठवडय़ाच्या मध्यावर कामाचा ताण वाढू शकतो. पण काम केल्याने मानसिक समाधानाची प्राप्तीसुद्धा होईल. एखादे अवघड काम करून दाखवाल. मित्रमंडळींमध्ये वेळ जास्त घालवल्यामुळे कौटुंबिक वातावरणात ताणतणाव येऊ शकतो. बरेच दिवस तुम्ही जे काम होण्याची अपेक्षा करत होतात ते काम होईल पण त्याला वेळ लागेल. नवीन खरेदी, शॉपिंग यामध्ये पैसा खर्च होईल.
दूध दान करावे.
कर्क
या आठवडय़ात तब्येतीची विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्यांना सांधेदुखी किंवा हाडांची दुखणी आहेत त्यांना त्रास वाढू शकतो. त्यामुळे आधीपासूनच तयारी केलेली बरी. पैशांच्या बाबतीत हा आठवडा सर्वसाधारण असेल. तुमच्या बोलण्याने दुसऱयाचे मन दुखावले जाऊ शकते त्यामुळे जिभेवर ताबा ठेवा. या आठवडय़ात कोणालाही उधारी देण्याच्या भानगडीत पडू नका.
औषधांचे दान द्यावे
सिंह
एखाद्या छोटेखानी सोहळय़ामध्ये किंवा समारंभामध्ये भाग घ्याल. मन धार्मिकतेकडे वळू शकते. योजनेप्रमाणे काम केल्यास यश प्राप्ती नक्की आहे. मित्रांशी वागताना आपला इगो सांभाळा. कुटुंबामध्ये वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू नका कारण त्यामुळे घरचे वातावरण बिघडण्याची शक्मयता आहे. प्रेमींनी एकमेकाला गिफ्ट दिल्यास आनंद द्विगुणित होईल. पैसे सांभाळून खर्च करावेत.
तुरटीने दात साफ करावेत
कन्या
तुमच्यामधील गुणांना वाव देणारा असा हा आठवडा असेल. फक्त पूर्वतयारी करायला विसरू नका. जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्याकरता अनुकूल काळ आहे. ज्यांना आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी करायची असेल त्यांनीसुद्धा या आठवडय़ात नियोजनबद्ध काम केल्यास यश मिळेल. या आठवडय़ामध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त होईल. भावनिक गुंतागुंतीचा काळ आहे त्यामुळे निर्णय घेताना बुद्धीने निर्णय घ्यावा.
फळ दान द्यावे.
तूळ
या आठवडय़ात घरच्या लोकांची मर्जी सांभाळणे गरजेचे असेल कारण व्यर्थ वादावादी करून कुठलेही संकट दूर होणार नाही. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी संधी तुम्हाला प्राप्त होण्याची शक्मयता आहे. पण आळशीपणामुळे नुकसान होऊ शकते. बरेच दिवस टाळाटाळ केलेले काम तुम्हाला या आठवडय़ात करावे लागेल. एखादी छोटी रक्कम तुम्ही पूर्वी दिली होती ती मिळेल.
सुगंधी अत्तर लावावे.
वृश्चिक
या आठवडय़ात घरातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडल्याने दवाखान्यात जावे लागू शकते. संसर्गजन्य रोगांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. पैशांची आवक वाढली तरी खर्चाचे प्रमाणही तितकेच वाढणार आहे त्यामुळे नियोजनबद्धरित्या काम करावे. जुन्या मित्राची भेट होऊ शकते. या आठवडय़ात तुम्हाला दुसऱया कडून पैसे मागायची वेळ येणार नाही याची काळजी घ्या.
लाल फळ दान करा
धनु
रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. आजूबाजूच्या लोकांचे सहकार्य प्राप्त होईल. मनात असलेली योजना कृतीमध्ये आणा कारण नंतर कदाचित वेळ मिळणार नाही. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे असे धोरण ठेवल्यास फायदा होईल. शारीरिक
तक्रारीकडे मात्र दुर्लक्ष करू नका. प्रेमसंबंधांमध्ये जास्तीच्या अपेक्षेने ताण येईल. कौटुंबिक वातावरण चांगले ठेवण्याकरता प्रयत्न करावे लागतील.
जोड केळीचे दान द्यावे
मकर
स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. शिक्षणात प्रगती होण्याची शक्मयता आहे. एखादे काम नवीन पद्धतीने केल्यामुळे त्यातून फायदा होईल. कामाच्या ठिकाणी व्यर्थ वादावादी करू नका. घरातील एखाद्या सदस्याची मनधरणी करावी लागेल. एखाद्या सभेत किंवा सामूहिक कार्यामध्ये भाग घ्याल. वाईट स्वप्नांकडे दुर्लक्ष करा. चिकाटी सोडली नाही तर यश नक्की मिळेल.
हळदीचा टिळा लावा
कुंभ
व्यक्ती तितक्मया प्रकृती हे लक्षात घ्या. सगळय़ांशी त्याच पद्धतीने वागण्याने कामे होणार नाहीत. येणाऱया आठवडय़ामध्ये लोकांची बऱयाच प्रमाणात बोलावे लागणार आहे. त्यांची मनधरणी करावी लागणार आहे. त्यामुळे जिभेवर साखर ठेवलेली बरी. एखादी व्यक्ती तुमचा इगो हर्ट करू शकते पण जर आपले काम होणार असेल तर तिकडे दुर्लक्ष केलेले बरे. कौटुंबिक वातावरण चांगले असेल.
वयाइतके कोळसे पाण्यात सोडावेत
मीन
कामाचा ताण तणाव आणि कौटुंबिक जबाबदाऱया यामध्ये ओढाताण होण्याची शक्मयता आहे. कुठलीही जबाबदारी दुसऱयाच्या अंगावर घालून चालणार नाही. आपल्याच लोकांशी कठोर बोलणे टाळावे. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. पारिवारिक सुख चांगले असेल. कागदोपत्री व्यवहार मात्र जपून करा. जे सिंगल आहेत त्यांना योग्य प्रपोजल मिळू शकते.
एखाद्या गरजू व्यक्तीला छत्री भेट द्यावी.
टॅरो उपायः बऱयाच लोकांचे म्हणणे असते की पैसा टिकत नाही. व्यावहारिक समजूतदारपणाबरोबरच हा उपाय करून पहा. शुक्रवारी सूर्योदयापूर्वी दीड तास हा उपाय करावा. एका छोटय़ा लाल रेशमी कपडय़ामध्ये एकवीस अखंड तांदळाचे दाणे ठेवावे. पोटली करावी आणि ही पोटली ज्या देवतेला मानता त्या देवतेला लावून खिशात ठेवावी.