दिनांक 11-9-2022 ते 17.9.22 पर्यंत
मेष
जीवनामध्ये सकारात्मक बदलाना सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. हे बदल शारीरिक आणि मानसिक त्याचबरोबर आर्थिक स्वरूपाचेही असू शकतात. तुमच्या व्यवहारातून आणि कृतीतून आत्मविश्वास झळकेल. आर्थिक बाबतीमध्ये सतर्क राहण्याची गरज आहे. कोणत्याही व्यवहारांमध्ये गुंतण्यापूर्वी पूर्ण चौकशी करावी. प्रेमींना अनुकूल वेळ आहे.
तमालपत्राचे पान जवळ ठेवावे.
वृषभ
गेल्या काही दिवसांपूर्वी जर तुम्हाला असे वाटले असेल की तुमच्यावर अन्याय झाला आहे तर येणाऱया काळामध्ये तुम्हाला न्याय नक्की मिळणार याची खात्री बाळगा. स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडविण्याकरिता अनुकूल वेळ आहे. तुमच्या आतल्या आवाजाला जर ऐकाल तर बऱयाच बाबतीमध्ये फायदा होण्याची शक्मयता आहे. काही सुखद तर काही द़ुःखद सरप्राईजेस मिळू शकतात.
सरकारी झाडांना पाणी घालावे.
मिथुन
हा आठवडा प्रेमींकरता खास असणार आहे. प्रेमात वृद्धी होईल. व्यवसायाच्या ठिकाणी एखाद्याची मनधरणी करावी लागेल. आर्थिक बाबतीमध्ये हा आठवडा सर्वसामान्य जरी असला तरी आत्ता केलेल्या प्लॅनिंगमुळे पुढे फायदा होईल. कुटुंबामध्ये किंवा मित्रांमध्ये एखादा गैरसमज पसरू शकतो. काही गोष्टींना स्वीकारणे तुम्हाला कठीण जाऊ शकते. नवीन प्रोजेक्टकरता योग्य वेळ आहे.
लाजाळूची पाने जवळ ठेवावी.
कर्क
सफलता मिळवण्याकरता किंवा विजय मिळवण्याकरता तुम्हाला कष्टाचे प्रमाण वाढवण्याची गरज आहे आणि ही स्थिती बराच वेळ कायम राहील असे संकेत आहेत. पूर्वीच्या नैराश्याला झटकून नव्या उमेदीने कामे करा. यश नक्की मिळेल. एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार असेल तर त्याकरता चांगले संकेत मिळत आहेत. यामध्ये स्वतःच्या फायद्याबरोबर दुसऱयाच्या फायदाही पहावा.
पक्ष्यांना चारा घालावा.
सिंह
तुम्ही समजता त्यापेक्षा तुमची ताकत आणि कुवत जास्त आहे हे सिद्ध करणारा हा आठवडा असेल फक्त गरज आहे ती चुकीच्या निर्णयांपासून दूर राहण्याची. काही लोक तुम्हाला चुकीचा सल्ला देण्याचा प्रयत्न करू शकतात. पण काही जवळचे सहकारी तुम्हाला योग्य वेळी इशारादेखील देतील. कौटुंबिक सुख उत्तम असेल. आर्थिक आवक मनासारखी होईल.
दिव्यांगाना जमेल ती मदत करावी.
कन्या
काही बाबतीमध्ये माघार घेतलेली बरी असा संदेश आहे. यामध्ये कौटुंबिक भांडण किंवा कामाच्या ठिकाणी असलेला कलह हे देखील समाविष्ट आहे. येणाऱया आठवडय़ामध्ये तुमच्या क्षमतेला योग्य दिशा मिळण्याचे संकेत आहेत. जेष्ठ व्यक्तीच्या सल्यामुळे एखादे न होणारे अवघड काम पूर्ण करू शकाल. सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल.
लाल मिठाई दान द्यावी.
तूळ
काही गोष्टींचा अंत ही नवीन आशेची सुरुवात असते हे ध्यानी घेण्यासाठी हा आठवडा आहे. स्वतःच्या तंद्रीमध्ये इतरांकडे दुर्लक्ष होऊ नये याची काळजी घ्यावी. काही कामांमध्ये अति गुंतल्यामुळे इतर कामांकडे दुर्लक्ष होऊन नुकसान होऊ शकते. एखाद्या बाबतीमध्ये रिस्क घेण्याची वेळ येईल पण यामध्ये फायदा असेल त्यामुळे पाठी फिरू नका. काही बाबतीमध्ये कायमचा बदल घडेल.
पिंजऱयातील पक्ष्याला मोकळे करावे.
वृश्चिक
तुमच्या कौशल्यपूर्ण संवादाचा फायदा तुम्हाला होईल. गेल्या काही दिवसांमध्ये विचार केला नसेल इतका चांगला परिणाम तुम्हाला मिळू शकतो. व्यवहारकुशलतेचे कौतुक होईल. एखाद्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल पण तो निष्फळ ठरेल. व्यावसायिक बाबतीमध्ये घेतलेले निर्णय योग्य ठरतील. कुटुंबातील व्यक्तींशी वाद-विवाद टाळावा. आर्थिक बाबतीत सावध रहावे.
गुळ दान द्यावा.
धनु
कष्टाचे फळ गोड असते याची प्रचिती तुम्हाला या आठवडय़ामध्ये येईल. पण लक्ष्य अजून दूर आहे आणि कष्टाला पर्याय नाही हे ध्यानी ठेवावे. या आठवडय़ामध्ये कुटुंबातील सदस्यांची सगळय़ा प्रकारची मदत तुम्हाला प्राप्त होईल. आर्थिक समाधानाबरोबर आपण योग्य रीतीने काम करतो आहोत याची खात्री तुम्हाला पटेल. सहकाऱयांशी वादविवाद मात्र टाळावा लागेल. आपले मत सौम्यपणे मांडा.
गरजूला वस्त्र दान करावे.
मकर
तुमची एक खासियत म्हणजे तुम्ही घडलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता त्या मनात ठेवता. एका अर्थाने याचा फायदा होतो पण दुसऱया बाजूने काही बाबतीत टेन्शनही येऊ शकते. घेतलेले निर्णय चारचौघांना विचारून आणि खात्री करून मगच वास्तवात आणावे.
आपल्या उंचीएवढा पिवळा धागा झाडाच्या फांदीला बांधावा.
कुंभ
येणाऱया काळात आत्मविश्वासात वाढ होईल. मानसन्मान प्राप्तीचे आणि अधिकार प्राप्तीचे संकेत मिळत आहेत. सगळय़ांना बरोबर घेऊन काम करण्यामध्ये भलाई आहे. परनिंदा शक्मयतो टाळावी. एखादी व्यक्ती तुमच्या बाबतीमध्ये कागाळी करू शकते. ज्यांना नोकरीत बदल हवा आहे त्यांना अनुकूल वेळ आहे. प्रेमींनी एकमेकांवर विश्वास ठेवावा.
जवळच्या धार्मिक स्थळी एखादे झाड लावावे.
मीन
येणारा आठवडा तुम्हाला स्वतःला शिस्त लावण्यामध्ये आणि कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यामध्ये घालवावा लागेल. तुमच्या गुणांना वाव मिळेल. सामाजिक प्रति÷ा प्राप्त होईल. हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळण्याची शक्मयता आहे. पण हे यश सहज नसेल त्याकरता कष्टही घ्यावे लागतील. आर्थिक बाबतीत हा आठवडा सर्वसामान्य असेल. वैवाहिक सुख उत्तम मिळेल.
धार्मिक स्थळी पिवळी मिठाई वाटावी.
टॅरो उपायः
एखादी व्यक्ती अति राग राग करत असेल तर घरातील सगळय़ांना त्याचा त्रास होतो. इतकेच काय, त्या व्यक्तीलादेखील त्रास होतो. अशावेळी काही दिवस लोखंडाचा छोटा तुकडा लाल होईपर्यंत तापवून लगेच थंड पाण्यात बुडवून ते पाणी त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात घालावे.