Tarun Bharat

राशींचा देश -टॅरो चा संदेश

Advertisements

दिनांक- 02-10-2022

 मेष

येणाऱया आठवडय़ामध्ये जिभेवर ताबा ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. बोलण्यात आणि खाण्या पिण्या मध्ये जर चूक झाली तर महागात पडू शकते. तुमच्या वडिलोपार्जित संपत्ती विषयी जर वाद असतील तर सामोपचाराने मिटविण्यात कडे कल ठेवा. कौटुंबिक समाधान चांगले प्राप्त होईल पण लहान मोठय़ा कारणाने थोडीफार चिडचिड होऊ शकते. पैशांच्या बाबतीत सावध रहा.

धार्मिक स्थळी मुळा ठेवून यावा

 वृषभ

कर भला तो हो भला याचा अनुभव येणार या आठवडय़ामध्ये येईल. पूर्वी ज्याला मदत केली होती अशी व्यक्ती तुमच्या मदतीला येऊ शकते. कुटुंबातील ताण-तणाव निवडण्याकरीता थोडाबहुत प्रयत्न करावा लागेल. विशेषतः संतती बाबतीमध्ये सबुरीने काम घेणे श्रेयस्कर ठरेल. योजनांना प्रत्यक्षात आणण्याकरता इतरांची मदत घ्यावी लागली तर मागेपुढे पाहू नका.

गाईला हिरवा चारा घालावा

 मिथुन

जुनी येणी वेळेवर न आल्याने मनस्ताप होऊ शकतो. या आठवडय़ामध्ये पैशांच्या देण्या घेण्यावरून काही लोकांशी वाद होऊ शकतात. आपल्या मनातील गुपित अगदी जवळच्या माणसाकडे सुद्धा बोलून दाखवू नका. पैशांच्या बाबतीत हा आठवडा सर्वसाधारण असेल. तब्येतीला अति जपण्याचे कारण नाही. तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये तुमच्या बाबतीत आदर निर्माण होईल.

तुळशीला दुध मिश्रित पाणी घालावे

 कर्क

या आठवडय़ामध्ये स्नायूचा किंवा पोटासंबंधी त्रास होऊ शकतो. डॉक्टरकडे जाण्याची वेळ आलीच तर टाळू नका. कुटुंबात वर्चस्व गाजवण्याच्या नादाला लागून इतरांची मने दुखवुन नयेत. वैवाहिक जोडीदाराला समजून घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी नवीन संधी प्राप्त होतील. एखाद्या ज्ये÷ व्यक्तीच्या सल्ल्यामुळे पैशाचे नियोजन चांगल्या रीतीने करू शकाल.

सुवासिनीला सौभाग्यालंकार भेट द्यावे

सिंह

ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं याचा शब्दशः अनुभव तुम्हाला येणाऱया आठवडय़ामध्ये येऊ शकतो त्यामुळे कोणालाही न मागता सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. कामे तुमच्या मनाप्रमाणे झाली नाही तर चिडचिड करून काही उपयोग होणार नाही याउलट आजूबाजूच्या माणसांना सोबत घेऊन कामे पूर्ण करण्याकडे लक्ष असू द्या. कौटुंबिक आणि आर्थिक समाधान मिळेल.

झोपताना घरी पांढरी मोहरी टाकावी

 कन्या

तुमच्या बुद्धिमत्तेला साजेल अशी कामे तुम्हाला मिळतील असा संदेश आहे. तुमच्या व्यवहारचातुर्य आला आणि बोलण्यातील हुशारीला वाव मिळेल. घेतलेल्या कामामध्ये यश मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत आनंदाने वेळ घालवाल. एखाद्या कले करता वेळ काढाल. जुना एखादा मित्र भेटून त्याच्यासोबत क्वालिटी टाईम घालवावासा वाटेल. या सगळय़ात कामाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका.

विहिरीमध्ये एक चमचा दूध घालावे

 तूळ

आर्थिक बाबतीमध्ये निष्काळजीपणा करून जाणार नाही. काम धंद्यांमध्ये थोडी निगेटिव्ह फ्रिज येण्याची शक्मयता आहे. त्यामुळे जे कराल ते अत्यंत सावध राहून करणे गरजेचे असेल. तुमच्या बरोबर काम करणाऱया व्यक्ती वरती विश्वास ठेवून कामे पूर्ण करण्याकडे जोर द्यावा. जुन्या गोष्टी उघडण्या मध्ये काहीही हासिल नाही हे तुमच्या लक्षात येईल. कौटुंबिक जबाबदारी वाढणार आहे.

कुत्र्याला चपाती घालावी

वृश्चिक

फाजील धाडस कोणत्याही बाबतीमध्ये दाखवू नये. कामाच्या ठिकाणी अतिआत्मविश्वास रडू शकतो. काही गोष्टी तुमच्या पासून जाणून-बुजून न पावल्या जातील. आपल्या भल्या करता इतरांचे सगळे बोलणे मान्य करू नये. नवीन ओळखीतून आर्थिक फायदा होऊ शकतो. कुटुंबातील ज्ये÷ व्यक्तींच्या तब्येतीविषयी काळजी वाटू शकेल. संततीची जपून वागावे.

आंब्याच्या झाडाजवळ हिरवा कपडा ठेवून द्यावा

धनु

उपलब्ध माहितीचा योग्य तसा उपयोग करून घ्याल. कामधंद्याच्या ठिकाणी नवीन धोरण वापरल्यामुळे नवीन कामे मिळतील आणि त्यात यशही मिळेल. घरातील आणि बाहेरच्या व्यक्तींचे वागताना त्यांना जास्त महत्त्व देऊन वागा; ज्यामुळे तुमची कामे वेळेवर पूर्ण होतील. कौटुंबिक समाधान प्राप्त करण्याकरता काही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागेल. आर्थिक आवक चांगली असेल. केळीच्या झाडाखालीं मातीचा टिळा लावावा

मकर

योजलेल्या कामांमध्ये यश मिळेल. आळस मात्र सोडावा लागेल. ध्यानीमनी नसताना एखादी व्यक्ती आर्थिक मदत करू शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास होईल. मित्र परिवारासोबत वेळ घालवताना पैशांचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी. आर्थिक आवक सर्वसामान्य असेल. गलथान कारभाराचा एखाद्या वेळेला फटका बसू शकतो.

वाहत्या पाण्यात कोळसे सोडावेत

 कुंभ

परिषदेशी थोडीफार तडजोड करावी लागेल. मनात योजलेल्या प्रत्येक कामाला यश मिळेलच असे नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये गुरफटून न जाता भविष्याबद्दल विचार करणे जास्त सोयीस्कर ठरेल. पूर्वी भांडण झाले होते अशा व्यक्तीशी समझोता होऊन काही कामे मिळण्याची शक्मयता आहे. भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

काजळाची डबी जवळ ठेवावी

मीन

कामांचे नियोजन नीट केल्यास फायदा होऊ शकतो. हा येणारा आठवडा धावपळीचा असणार आहे. घरातील कामे आणि बाहेरची कामे यांचे संतुलन राखताना तब्येतीवर विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. गरज असेल तेव्हा न चुकता दुसऱयाचा सल्ला घ्यावा यातून फायदा होण्याचे संकेत आहेत. मनातील सगळय़ा गोष्टी इतरांना सांगू नयेत. लोक त्याचा फायदा घेऊ शकतात.

हीना अत्तर वापरावे

टॅरो उपायः  तिजोरी च्या टिप्सः  पैसा किंवा दाग-दागिने ठेवतो त्या ठिकाणी हिरव्या मार करणे उभा बाण काढावा. तिजोरीचे शक्यतो उत्तरेच्या दिशेला ठेवावी. तिजोरीवर कोणतीही जड वस्तू ठेवू नये. तिजोरीमध्ये रोजची काहीतरी भर नक्की घालावी. काही लोक तिजोरीमध्ये देव-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवतात. त्याची पाळ्णक करणे गरजेचे असते.

Related Stories

आजचे भविष्य 19-10-2022

Amit Kulkarni

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 5 ऑक्टोबर 2020

Patil_p

नवरात्री उपवासाचा आहार!

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 12 एप्रिल 2022

Patil_p
error: Content is protected !!