दि. 30-12-2022 ते 5.11.2022 पर्यंत
मेष
कोणत्याही परिस्थितीमध्ये घाई करु नका आणि आजूबाजूच्या माणसांना समजून घेण्याचा प्रयत्न करा असा टॅरोचा संदेश आहे. तुमच्या आजूबाजूला घडणाऱया घटना तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीने तडजोड करायला भाग पाडू शकतात. कौटुंबिक सुखामध्ये बाहेरच्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे समस्या होऊ शकते. आर्थिक बाजू भक्कम असेल. तब्येतीच्या छोटय़ा-मोठय़ा तक्रारी सोडल्या तर काळजी करण्याचे कारण नाही.
हिरव्या रंगाच्या काचेच्या बाटलीतील पाणी प्यावे.
वृषभ
मित्र परिवाराकडून किंवा कुटुंबीयांकडून अति अपेक्षा ठेवल्या तर अपेक्षाभंग होऊ शकतो असे टॅरोचे म्हणणे आहे. तुमच्या कामातील वेग आणि उत्साह कमी होऊ देऊ नका. या आठवडय़ात काही नवीन आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. आर्थिक व्यवहारांमध्ये एखादी व्यक्ती तुम्हाला मदत करेल. वाहन खरेदी किंवा नवीन वास्तूबद्दल विचार कराल. कुटुंबातील लोकांना तुमच्या मदतीची गरज असेल. प्रेमींना उत्तम आठवडा आहे.
उडणाऱया हंसाचे चित्र जवळ ठेवावे.
मिथुन
तुम्ही इतरांची काळजी घेतली तर ते तुमची काळजी घेतील आणि हेच इतरही बाबतीत लागू होते असा संदेश टॅरोचा आहे. आठवडय़ाची सुरुवात थोडी धावपळीची असेल. शुक्रवारच्या आत तुमची महत्त्वाची कामे उरकून घेण्याचा प्रयत्न करा. विकेंडला प्रवास करू शकता. कामधंद्याच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. तब्येतीची काळजी करण्याचे कारण नाही. आर्थिक बाजू चांगली असेल.
घरात पर्वताचे सुंदर चित्र ठेवावे.
कर्क
मनोबल वाढवावे लागेल, उदास वृत्तीने केलेल्या कामामध्ये यश मिळण्याची शक्मयता कमी असते असा टॅरोचा संदेश आहे. हा आठवडा सर्वसाधारणपणे थोडय़ा आशेचा आणि थोडय़ा निराशेचा असेल. मनावर कुठलेतरी दडपण येऊ शकते. खास करून नोकरदार वर्गाने आपल्या कामात चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराची साथ महत्त्वाची ठरेल. एखादी आवडती वस्तु हरवू शकते.
जांभळा हातरुमाल जवळ ठेवावा.
सिंह
जितक्मया नम्रतेने परिस्थितीला हाताळाल आणि जितक्मया अदबीने लोकांशी वागाल तितकी मने जोडली जातील, मग्रुरीने मने दुखावली जातात तेव्हा सांभाळा असे म्हणणे टॅरोचे आहे. काही प्रसंग वादावादीचे येऊ शकतात. घरातील एखादी व्यक्ती प्रवासाला जाऊ शकते. तुमच्या मनातील भावनांना योग्य रीतीने व्यक्त होण्याची गरज आहे. आर्थिक आणि सामाजिक दोन्ही बाजूंना भक्कम करा. जोडीदाराशी वाद होतील.
धार्मिक स्थळी दूध द्यावे.
कन्या
जास्तीत जास्त प्रसंगी लोक तुमचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील, पण त्या वेळी आपले नुकसान होऊ नये याची काळजी घ्यावी असा टॅरोचा संदेश आहे. काही व्यवहारामध्ये छोटे-मोठे नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात चांगली प्रगती होईल. आठवडय़ाच्या मध्यावर एखादे अवघड काम तुमच्यावर पडू शकते पण तुम्ही ते व्यवस्थित पार पाडाल. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा नको.
काळय़ा रंगाचा कमीत कमी वापर करा.
तूळ
या राशीच्या लोकांनी कर्मे करावीत पण फळांची अपेक्षा तूर्तास न केलेली बरी, फळ मिळेल आणि चांगले फळ मिळेल पण त्याला उशीर लागू शकतो असा टॅरोचा संदेश आहे. आर्थिक बाबतीत थोडय़ा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक कारणामुळे प्रवास घडेल. जुन्या मित्राची भेट संभवते. तुमच्या अपेक्षांचे ओझे दुसऱयावर लादू नका. एखादी व्यक्ती चुकीच्या वागणुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करू शकते.
डाव्या अंगठय़ाच्या खाली हिरव्या शाईने 24 नंबर लिहावा.
वृश्चिक
आपल्या मनातील गोष्टी किंवा आपल्याना व दुसऱयांनाही सांगू नयेत आणि दुसऱयांच्या कुठल्याही बाबतीमध्ये आपण हस्तक्षेप करू नये असा टॅरोचा संदेश आहे. या आठवडय़ामध्ये काही जुने येणे वसूल करण्याचा प्रयत्न करा. प्रिय व्यक्तीची भेट घडू शकते. नेहमीच्या कामाचा कंटाळा येऊन काही नवे करावेसे वाटेल. काही जुन्या गोष्टींचा त्याग करून नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबात एखादी जबाबदारी स्वीकारावी लागेल.
अन्नदान करावे.
धनु
टॅरोचे म्हणणे असे आहे की तुम्ही चिकाटीने जर कामे पूर्ण केली तर त्यात यश नक्की आहे. या आठवडय़ात बऱयाच भेटीगाठी होऊन काही चर्चा होतील आणि त्यातून महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. विद्यार्थी दशेतील व्यक्तींनी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. काही बातम्या समजतील त्यातील खऱया कुठल्या आणि खोटय़ा कुठल्या हे ठरवा. आर्थिक बाजू कमकुवत होणार नाही याची काळजी घ्यावी.
पिवळय़ा कागदावर पंचकोन काढून जवळ ठेवावा.
मकर
तुमच्या आसपासच्या व्यक्ती काही बाबतीत तुम्हाला अंधारात ठेवण्याचा प्रयत्न करतील पण यातून तुम्ही मार्ग काढाल असा संदेश आहे. मनातील इच्छा पूर्ण होतील. जवळच्या व्यक्तींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढल्यामुळे दमछाक होऊ शकते. केलेल्या कामांकरता तुम्हाला श्रेय मिळेल अशा भ्रमात राहू नका. तुमच्या भल्याकरता एखादी व्यक्ती तुम्हाला चांगला सल्ला देईल.
पक्ष्यांना दाणे घाला.
कुंभ
‘वाईट तितुके इथे पोसले भलेपणाचे भाग्य नासले’ असा काहीसा अनुभव या आठवडय़ामध्ये येऊ शकतो असा संदेश आहे. चूक नसताना बोलणी खावी लागणे किंवा कारण नसताना एखाद्या व्यक्तीशी वाद होणे अशा प्रकारच्या घटनांना सामोरे जावे लागण्याची शक्मयता आहे. पैशांच्या बाबतीत काळजी करण्याचे कारण नाही. तब्येतीला मात्र सांभाळावे लागेल. कुटुंबातील व्यक्तींकरता बऱयाचशा बाबतीत तडजोड करावी लागण्याची शक्मयता आहे.
धार्मिक पुस्तकाचे दान करावे.
मीन
जितके द्याल तितके परत मिळेल आणि जितके काम कराल इतकी प्रगती होईल असा संदेश टॅरो देत आहे. या आठवडय़ाचा सगळय़ात चांगला उपयोग नोकरदार वर्गाला होईल. व्यवसायिकांनी नव्या संधींचा प्रतीक्षेत वेळ घालवू नये. आर्थिक बाजू कमकुवत राहणार नाही. महत्त्वाच्या कामांकरता हा आठवडा चांगला आहे. तुमच्या निर्णयांना कृतीची आवश्यकता असेल. कौटुंबिक जबाबदाऱया निभावताना दमछाक होण्याची शक्मयता आहे.
वस्त्र दान करावे.
टॅरो उपायः
घरातील ज्ये÷ व्यक्तींशी जर जास्त वाद-विवाद होत असेल तर पूर्व दिशेला ठेवलेली तडा गेलेली भांडी किंवा रिकाम्या कुंडय़ा, खराब झालेले इलेक्ट्रॉनिक सामान ताबडतोब हटवावे.