पुरस्थिती मात्र नियंत्रणात : नद्याच्या पाण्याची पातळी वाढली : जलस्रोत खात्याचे अधिकारी 24 तास कार्यरत
प्रतिनिधी /डिचोली
डिचोली तालुक्मयात जोरदार पावसाचा कहर सुरूच असून तालुक्मयातील सर्व गावांना झोडपून काढले आहे. सोमवारपासून या पावसाने जोर धरला असून तालुक्मयातील सर्व नद्या नाले, ओहोळ फुल्ल झालेले आहेत. त्यामुळे जर पावसाचा मारा सतत रात्रभर व दिवसभर चालूच राहिल्यास काही ठराविक भागांमध्ये पुरसदृष्य स्थिती निर्माण होण्याची शक्मयता आहे. या सर्व परिस्थितीवर डिचोली जलस्रोत खात्याचे अभियंते व अधिकारी 24 तास लक्ष ठेऊन आहेत.
डिचोली तालुक्मयातील सांखळी व साळ या भागांना विशेषतः पावसामुळे पुराचा धोका असतो. परंतु सांखळी कार्यान्वति असलेल्या पूर नियंत्रण यंत्रणेमुळे पुराचा धोका तसा कमीच आहे. तरीही वाळवंटी नदीतील पाण्याची पातळी नियमित तपासणे, नदीला पाणी वाढल्यानंतर बाजारातील नाल्यात पाणी मोठय़ा प्रमाणात तुंबून राहते. त्यामुळे सांखळी बाजारात पूर येण्याची शक्मयता असते. त्यावेळी समय सूचकता बाळगून बाजारातील नाल्यात साचणारे पाणी पंपिंग करून पुन्हा नदीत फेकण्याचे व्यवस्था आहे. काल मंगळ. दि. 5 रोजी संध्याकाळी काही काळासाठी पंपिंग करून बाजारातील पाणी बाहेर फेकण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती.
साळ गावातून जाणाऱया शापोरा नदीची पातळी सध्या वाढली असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. या नदीला महाराष्ट्रातील डोंगर माथ्यावर पडणाऱया पावसाचे मोठय़ा प्रमाणात पाणी येते. मात्र तिळारी धरणातील पाण्याची पातळी वाढल्यानंतर धरणाचे पाणी थेट या नदीत सोडण्यात येते, त्यामुळे साळ गावात पूर येतो. अद्याप धरणातील पाण्याची पातळी नियंत्रणात असल्याने साळ गावाला पुराचा धोका सध्यातरी कमीच आहे. तरीही गोवा राज्य जलस्रोत खात्याच्या अधिकाऱयांकडून तिळारी धरणाच्या पाणी पातळीवर लक्ष आहे. नदीची पातळी व पावसाचा जोर लक्षात घेऊन तिळारी धरणातील पाणी टप्प्याटप्प्याने नदीत सोडण्याची खबरदारी यावेळी घेतली जाणार असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले.
सध्या डिचोली नदीचे पाणी बरेच वाढले आहे. नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे या नदीला जोडलेल्या नाले ओहोळातील पाणी नदीत जात नाही. सदर पाणी भरून राहिल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. डिचोली नदीच्या बाहेर भरणारे पाणी पंपिंग करून नदीत फेकण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. या योजनेमुळे डिचोली भागातही पूराचा धोका कमीच आहे. जोरदार पाऊस आणि वाऱयामुळे तालुक्मयात काही ठिकाणी झाडांची पडझड झाली होती. डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी दलाचे अधिकारी शैलेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य केले.