Tarun Bharat

इंडोनेशियात मिळाले सर्वात मोठे फुल

Advertisements

ज्या लोकांना ऍडव्हेंचर पसंत आहे, ते जंगलात जाऊन एक्सप्लोर अवश्य करत असतात. अलिकडेच एक व्यक्ती इंडोनेशियाच्या जंगलात ट्रेकिंग करत असताना त्याला एक दुर्लभ फुल दिसून आले आहे. या फुलाविषयी त्याने माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता हे फूल रॅफलेसिया अर्नोल्डी असून ते जगातील सर्वात मोठे फूल असल्याचे समोर आले. हे फूल त्याच्या अत्याधिक दुर्गंधीसाठी ओळखले जाते. इंडोनेशियाच्या वर्षावनांमध्ये हे फूल आढळते आणि ते 3 फूटांपर्यंत वाढू शकते आणि याचे वजन 15 पाउंडपर्यंत जाऊ शकते.

ट्विटरवर या फूलाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला असून यात हे फूल जमिनीवर पडलेले दिसून येत आहे. रॅफलेसिया अर्नोल्डी फूलाचा रंग लाल आहे. इंडोनेशियाच्या एका जंगलातून जात असताना एका व्यक्तीला हे दुर्लभ फूल दिसून आले. हे फूल जवळपास 4 दिवसांमध्ये पूर्णपणे फुलत असते.

सोशल मीडिया युजर्स हे विशाल आकाराचे फूल पाहून दंगच झाले. अनेक जणांना तर हे फूल खरोखरच असण्याबाबत विश्वास बसला नाही. हे फूल एलियन्ससारखे वाटत असल्याचे एका युजरने थट्टेच्या सुरात म्हटले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 36 हजारांहून अधिक जणांना पाहिला आहे.

Related Stories

धूम्रपान सोडा, 40 हजार मिळवा

Patil_p

30 वर्षांनी दृष्टीस पडले ‘भूत गाव’

Patil_p

बॉम्बवर्षावादरम्यान सैनिक जोडप्याचा विवाह

Patil_p

गुलाबी रंगासोबत विवाहबद्द

Patil_p

जगातील सर्वात धोकादायक पक्षी

Patil_p

घरभाडे वाढल्याने कारमध्ये झोपण्याची वेळ

Patil_p
error: Content is protected !!