कंबोडियात आढळून आला अनोखा जीव
व्हेलला सर्वात मोठा मासा मानले जाते, जो समुद्राच्या खाऱया पाण्यात आढळून येतो. परंतु गोडय़ा पाण्यातील सर्वात मोठय़ा माशाबद्दल फारशी माहिती नसते. 17 वर्षांपासून जीवशास्त्रज्ञ जेब होगन हे जगातील गोडय़ा पाण्यातील सर्वात मोठय़ा माशाचा शोध घेत होते. त्यांचा हा शोध आता पूर्ण झाला आहे. 13 जून रोजी त्यांच्या टीमने एक विशाल आकाराचा स्टिंगरे मासा शोधला असून तो गोडय़ा पाण्यातील आतापर्यंत आढळून आलेला सर्वात मोठा मासा आहे.
हा मासा कंबोडियाच्या मेकांग नदीत आढळून आला आहे. माशाची लांबी 13 फूट असून याचे वजन 300 किलोग्रॅम इतके आहे. हा मासा 2005 मध्ये थायलंडमध्ये पकडण्यात आलेल्या विशाल कॅटफिशपेक्षा 6.8 किलोने अधिक वजनाचा आहे. हा गोडय़ा पाण्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा मासा आहे. या प्रजातीचा स्टिंगरे मासा अत्यंत धोकादायक असतो, त्यांची शेपटी अत्यंत विषारी असते, जी जवळपास एक फूट लांबीची असू शकते. परंतु हा मासा माणसांसाठी धोकादायक नसतो असे डॉ. होगन यांनी म्हटले आहे.
जाळय़ात अडकला मासा
सर्वसाधारणपणे हा मासा एक स्वस्त प्रोटीन स्रोत म्हणून बाजारात आढळतो. डॉ. होगन दक्षिण आशियात नदीतील जैववैविध्याच्या रक्षणासाठी काम करणाऱया वंडर्स ऑफ द मेकांग प्रकल्पाचे सदस्य आहेत. मच्छिमारांनी हा मासा पकडल्यावर सर्वप्रथम डॉ. होगन यांनाच कळविले. आतापर्यंत कुणीच एवढा मोठा मासा पाहिला नव्हता.
वैज्ञानिक चकित
हा मासा मिळण्याच्या एक महिन्यापूर्वीच आणखी एक मोठा स्टिंगरे मासा मिळाला होता, त्याचे वजन 181 किलोग्रॅम होते. दोन अन्य मोठमोठे स्टिंगरे चालूवर्षी पकडण्यात आले होते. गोडय़ा पाण्यातील सर्वात मोठा मासा मेकांगमध्ये मिळणे खरोखरच एक अनोखा शोध आहे. हे अधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र आहे. येथे नदीसमोर अनेक मोठी आव्हाने असल्याचे डॉ. होगन यांनी म्हटले आहे.