Tarun Bharat

…तरी आमदार स्वत:ला गरीब म्हणवतात; ठाकरे गटाच्या नेत्याने मांडलं पगाराचं गणित

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

अकोला जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाचे नेते ॲड. जयेश वाणी यांनी आमदारांना मिळणाऱ्या पगाराचं गणित ट्विटरच्या माध्यमातून शेअर केलं आहे. तसेच 32 लाखांचं वार्षिक पगार घेणारे आमदार स्वतःला गरीब म्हणवतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

जयेश वाणी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “32 लाख रुपयांचे वार्षिक, 5 वर्षांसाठी 1,63,16, 820 रुपये इतकी रक्कम पगार म्हणून मिळणारे आमदार स्वतःला गरीब म्हणवतात. विशेष इंटेस्टींग पार्ट म्हणजे मोबाईल महिन्याला 999 रुपयांमधे आणि लँडलाईनसाठी 330 रुपयांमध्ये अनलिमीटेड कॉलींग मिळत असताना आमदारांना 10,000 दिले जातात”, हे ही त्यांनी यामाध्यमातून निदर्शनास आणून दिले आहे.

या ट्विटसोबत वाणी यांनी महाराष्ट्र विधानमंडळाकडून माहितीच्या अधिकाराअंतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीचे पत्र जोडले आहे. त्यामध्ये आमदारांना मिळणारे मूळ वेतन, महागाई भत्ता, दूरध्वनी सुविधा भत्ता, स्टेशनरी टपाल सुविधा भत्ता आणि संगणक चालक सुविधा मिळण्यासाठीचा भत्ता अशा वेगवेगळय़ा भत्त्यांचा समावेश आहे.

अधिक वाचा : सिसोदियांना 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

Related Stories

आरक्षणावर मंत्री नारायण राणे, दानवे गप्प का?; संजय राऊतांचा सवाल

Archana Banage

अंत्योदय व प्राधान्य रेशनकार्डवरच मिळणार मोफत धान्य

Archana Banage

संचारबंदी : वाहनधारकांशी अशोभनीय वर्तन, शाहुवाडी पोलीस ठाण्यातील दोघा कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली

Archana Banage

धक्कादायक : राज्यात आतापर्यंत 714 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण

Archana Banage

महाविकास आघाडी सरकार म्हणजेच ‘मिनी यूपीए: संजय राऊत

Archana Banage

जतचे माजी आमदार मधुकर कांबळे यांचे निधन

Archana Banage